मुंबई। मंगळवारी (१२ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध २३ धावांनी विजय मिळवला. चेन्नईसाठी हा विजय खास ठरला, कारण चेन्नईचा हा आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिला विजय ठरला. हा विजय चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा याने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीला समर्पित केला आहे.
कर्णधार जडेजाचा पहिला विजय
आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद (CSK Captaincy) सोडले. त्यामुळे धोनीच्या जागेवर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण त्याच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीला चांगली सुरुवात झाली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई (Chennai Super Kings) पहिल्यांदाच हंगामातील पहिले चार सामने पराभूत झाले. पण अखेर बेंगलोरविरुद्ध हंगामातील पाचवा सामना खेळताना चेन्नईने पहिला विजय नोंदवला.
हा विजय जडेजाने त्याची पत्नी रिबावा हिला आणि संघाला समर्पित केला आहे. याबद्दल त्याने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, ‘हा माझा कर्णधार म्हणून पहिला सामना होता. मी त्याला माझ्या पत्नीला आणि संघाला समर्पित करतो. कारण पहिला विजय हा नेहमीच खास असतो. याआधीच्या चार सामन्यात आपली विजय मिळवू शकलो नव्हतो. पण एक संघ म्हणून आम्ही चांगले पुनरागमन केले.’
याबरोबरच जडेजाने फलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘फलंदाजी फळीने चांगली कामगिरी केली. रॉबिन आणि शिवम यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजांनाही आपली जबाबदारी चांगल्याप्रकारे निभावली.’ तसेच जडेजाने असेही सांगितले की, संघव्यवस्थापनाचा त्याच्यावर कोणताही दबाव नाही. तसेच अजूनही तो वरिष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शन घेतो. त्याचबरोबर एमएस धोनीचीही मदत घेतो.
चेन्नईचा पहिला विजय
चेन्नईसाठी बेंगलोरविरुद्धचा विजय आणखी खास ठरला आहे, कारण चेन्नईचा हा २०० वा आयपीएल सामना होता. या सामन्यात या सामन्यान चेन्नईने रॉबिन उथप्पा (८८) आणि शिवम दुबे (९५) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या होत्या. तसेच २१७ धावांचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकांत ९ बाद १९३ धावाच करता आल्या. हा रविंद्र जडेजाचा चेन्नईचा कर्णधार म्हणून पहिलाच विजय ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेला ‘या’ १७ चेंडूंमुळे मिळाला विजय, आरसीबी उभ्या आयुष्यात विसरणार नाही हा पराभव
रायुडूची ३६व्या वर्षी चित्त्यासारखी चपळाई, आरसीबीच्या फलंदाजाला एकहाती झेल घेत धाडलं तंबूत
चेन्नईने बेंगलोरला पराभूत तर केलेच, पण’ या’ यादीत अव्वल क्रमांकावरील मुंबईशी साधली बरोबरी