---Advertisement---

अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रविंद्र जडेजा म्हणाला, ‘मी लवकरच…’

On: मंगळवार, जानेवारी 12, 2021 3:38 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी सिडनीत पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. मात्र या अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात त्याची गरज लागली असती, तरी सुद्धा तो फलंदाजी करण्यासाठी येणार होता. परंतु अश्विन आणि विहारी यांनी अत्यंत जिकिरीने फलंदाजी करताना हा सामना अनिर्णीत राखला.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने दुसर्‍या डावात गोलंदाजी सुद्धा केली नव्हती. मात्र दुसर्‍या डावात वेळ पडली असती तर तो फलंदाजी करायला तयार होता. त्यामुळे पॅड वैगेरे बांधून तयार होवून बसला होता. मात्र अश्विन आणि विहारी यांनी भारतीय संघाचा डाव सांभाळला.

जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. अशात त्याला शस्त्रक्रिया करायची होती. या कारणामुळे तो सोमवारी संध्याकाळी हॉस्पिटलसाठी रवाना झाला होता. ज्या ठिकाणी मंगळवारी त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गोष्टीची माहिती स्वत: रवींद्र जडेजाने दिली आहे.

रवींद्र जडेजा ट्विट करताना म्हणाला, “थोड्या कालावधीसाठी खेळामधून बाहेर झालो आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाली. मात्र लवकरचं धमाकेदार पुनरागमन करेन.” सोमवारी बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, चौथ्या कसोटीसाठी रवींद्र जडेजा भारतीय संघाचा भाग असणार नाही. हा सामना 15 जानेवारी पासून ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे.

तत्पूर्वी तिसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रवींद्र जडेजाला फलंदाजी करताना मिशेल स्टार्कचा वेगवान चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला होता. त्यामुळे त्याचा अंगठा डिस्लोकेट झाला आहे. जडेजा भारतात परतण्या अगोदर ऑस्ट्रेलियातच हाडांच्या विशेष तज्ज्ञांकडून उपचार घेईल. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरू येथे जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

टेस्ट रँकिंगमध्ये चमकला ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या, तर भारतीय गोलंदाजांची घसरण

‘दंगल गर्ल’ बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, खास ट्विट करत दिली माहिती

चुकीसाठी माफी मागतो! अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर टीम पेनला झाली उपरती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---