नुकतीच चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या हातून यजमान भारताचा २२७ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर भारतीय संघासाठी अजून एक बातमी पुढे येत आहे. दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर असलेला अष्टपैलू रविंद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त नाही. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीदरम्यान जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्या सामन्यातील दुसऱ्या डावात तो खेळताना दिसला नव्हता. पुढे त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे कळल्याने तो मायदेशी परतला होता. त्यानंतर बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याला पुनर्वसन कार्यक्रमासाठी पाठवण्यात आले होते. अशात भलेही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ कसोटी सामन्यात त्याची निवड करण्यात आली नाही. परंतु अहमदाबाद येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातून तो पुनरागमन करेल, अशी सर्वांना आशा होता.
मात्र माध्यमांतील वृत्तांनुसार, ३२ वर्षीय जडेजा अजून पुर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्याची दुखापत बरी होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या २ कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. एवढेच नव्हे तर, त्याला पुढील टी२० मालिकेलाही मुकावे लागू शकते.
रविंद्र जडेजाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जडेजाने उत्तम कामगिरी केली होती. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने नाबाद ६६ धावांच्या सर्वोच्च खेळीसह एकूण ११५ धावा चोपल्या होत्या. तसेच १ विकेटही घेतली होती. कसोटी मालिकेतील २ सामन्यात खेळताना त्याने ७ विकेट्स घेतल्या होत्या. सोबतच अर्धशतकासह ८५ धावाही केल्या होत्या. याबरोबरच एका टी२० सामन्यात नाबाद ४४ धावाही केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची काळजीत घट! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या ‘या’ घातक गोलंदाजाला दिली जाणार विश्रांती
काय सांगता! रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? जाणून घ्या खरं काय ते
भारतीय संघासाठी खुशखबर! अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी झाला फिट, ‘या’ खेळाडूची घेऊ शकतो जागा