आयपीएल 2021 मध्ये शानदार कामगिरी कारणारा रवींद्र जडेजा भारताकडून पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जडेजाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या दौर्याच्या तयारीत जडेजाला कसलीही उणीव सोडायची इच्छा नाही. म्हणूनच तो घरीदेखील जोरदार सराव करत आहे.
जडेजाने त्याच्या तयारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पसंद केला जात आहे.
जडेजाने दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मायभूमीत झालेली कसोटी मालिका खेळली नाही. तसेच दुखापतीमुळे तो मर्यादित षटकांच्या मालिकेतही खेळू शकला नाही. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामना खेळला होता. हा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात देखील रविंद्र जडेजाचे फार मोठे योगदान दिले होते. मात्र त्याच सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 4 गडी बाद केले तर फलंदाजीदरम्यान 28 धावा देखील केल्या होत्या.
https://www.facebook.com/watch/?v=774968983184792
रवींद्र जडेजाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने भारतासाठी एकूण 51 कसोटी, 168 एकदिवसीय आणि 50 टी-20 सामने खेळलेले आहेत. यादरम्यान त्याने कसोटी सामन्यात 1954 धावा केल्या असून 220 बळी घेतले आहेत. तसेच त्याने 2411 एकदिवसीय धावा आणि 188 एकदिवसीय बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात त्याने भारतासाठी 217 धावा केल्या असून 39 बळी घेतले आहेत.
न्युझीलंडविरुद्ध 18 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील जडेजाकडून सर्व क्रिकेटप्रेमींना अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, जडेजा या अपेक्षांनुसार खरा उतरतो का नाही?
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हा’ असावा रोहितचा सलामी जोडीदार, चाहत्यांच्या मागणीने धरला जोर
भारीच की! श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाला ‘द वॉल’ राहुल द्रविडचं देणार प्रशिक्षण?