कोरोना वायरसच्या उद्रेकामुळे अखेर आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व खेळाडू हळूहळू आपापल्या घरी पोहचत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू व आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग असलेला रवींद्र जडेजा हा आपल्या घरी पोहोचला आहे. घरी पोहोचतात जडेजाने आपल्या सर्वात प्रिय साथीदाराचे फोटो शेअर केले आहेत.
जडेजाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आपल्या घोड्यांचे फोटो शेअर केले आहेत. त्याने या फोटोंना कॅप्शन दिले आहे की,”मी त्या ठिकाणी पुन्हा आलो आहे, ज्या ठिकाणी मला सुरक्षित वाटते.”
जडेजाने यावेळी शेयर केलेल्या घोड्यांचे फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. जडेजाचे आपल्या घोड्यांबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्याने यापूर्वी देखील अनेक वेळा आपल्या घोड्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
Back to the place where I feel safe!!🐎 #farmhouse #staysafe pic.twitter.com/17l9eNnw0b
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 5, 2021
दरम्यान, जडेजाच्या आयपीएल 2021 मधील कामगिरीचा विचार केला असता, त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचीच वाहवा मिळवली आहे. विशेषतः रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेल विरूद्ध एकाच षटकात ठोकलेल्या 37 धावांमुळे जडेजा संपूर्ण क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनला होता.
आयपीएल 2021 स्पर्धा जरी रद्द झाली असली तरी, आगामी काळात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही जडेजाकडून अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा सर्व क्रिकेटप्रेमींना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मध्ये आपल्या संघाच्या एकूण धावांत सर्वाधिक योगदान देणारे टॉप ५ फलंदाज
कोरोनाने घेतला आणखी एका क्रिकेटरचा बळी; राजस्थानचा रणजीपटूने अवघ्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘या’ कारणामुळे कोरोनाची लागण झालेल्या माईक हसी, बालाजीला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आले चेन्नईत