नागपूर कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियान मीडिया आणि त्यांचे खेळाडू हा सामना सुरू होण्यापूर्वीच खेळपट्टीविषयी चिंता व्यक्त करत होता. खेळपट्टी रँक टर्नर (फिरकी गोलंदाजीसाठी अधिक अनुकूल) असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्या दिवशी जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या रविंद्र जडेजा याच्या मते खेळपट्टी रँक टर्नर नव्हती.
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा पहिला सामना गुरुवारी (9 फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियने पहिल्या डावात 177 धावा केल्या. पाहुण्या संघाला स्वस्तात गुंडाळण्यासाठी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. जडेजाने टाकलेल्या 22 षटकांमध्ये 47 धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाची खास प्रतिक्रिया –
पहिल्या दिवसाच्या प्रदर्शनासाठी रविंद्र जडेजाचे सर्वत्र कौतक होत आहे. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने माध्यमांसमोर खेळपट्टीविषयी खास प्रतिक्रिया दिली. जडेजा म्हणाला, “ही खेळपट्टी एक रँक टर्नर नाहीये. खेळपट्टीवर चेंडूला गती कमी मिळत आहे आणि इतर खेळपट्ट्यांच्या तुलनेत बाउंस देखील कमी आहे. मला वाटते आज डिफेंड करणे जास्त अवघड नव्हते. पण सामना जसजसा पुढे जाईल, डिफेंस करणे अवघड होत जाईल. कसोटी क्रिकेट असेच असते.”
रविंद्र जडेजाकडून ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांना सल्ला –
जडेजाने यावेळी बोलताना ऑस्ट्रेलिया फिरकी गोलंदाजांना देखील सल्ला दिला. “त्यांच्या फिरकी गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. हा फक्त वेळेचा विषय आहे. असे नाहीये की तुम्ही फक्त गोलंदाजी करत आहात आणि प्रत्येक षटकात तुम्हाला विकेट मिळत आहे. तुम्हाला गोलंदाजी सुरू ठेवात संयम राखावा लागतो. तुम्हाला ओव्हर द विकेट अराउंड द विकेट गोलंदाजी करावी लागते. जेव्हा फलंदाजांची भागीदारी जमली असेल, तेव्हा तुम्हाला गोलंदाजीत बदल करावा लागतो. योग्य एरियामध्ये चेंडू टाकावा लागतो,” असे जडेजा पुढे म्हणाला. (Ravindra Jadeja’s reaction after the first day’s play)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्डब्रेकर अश्विन! अनेक दिग्गज होऊन गेले मात्र ही कामगिरी फक्त आण्णाच्याच नावे
नागपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला भारताचा एक्स-फॅक्टर मानतोय पाकिस्तानी दिग्गज, म्हणाला…