इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) एकाच सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. हैदराबादसाठी हेनरिक क्लासेन याने शतक केले होते. प्रत्युत्तरात विराट कोहली याचे शतक चाहत्यांना पाहायला मिळाले. आरसीबीने 19.2 षटकांमध्ये हा सामना नावावर केला. सोबलतच प्लेऑफसाठी आपले आव्हान कायम ठेवले.
आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य हैदराबादकडून मिळाले होते. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीमुळे आरसीबीने हे लक्ष्य डावातील चार चेंडू शिल्लक असतानाच गाठले. विरानेट 62 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर आपले शतक पूर्ण केले. पण आपल्या डावातील 63व्या चेंडूवर विराट झेलबाद झाला. षटकाराने शतक पूर्ण केल्यानंतर विराटने भूवनेश्वर कुमारला सलग दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी सीमारेषेजवळ उभा असलेल्या ग्लेन फिलिप्सने जराही न चूकता झेल घेतला. विराट साथ देत कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 47 चेंडूत 71 धावा केल्या. फाफने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. टी नटराजनने टाकलेला एक चेंडूत फाफने राहुल त्रिपाठीकडे खेळला आणि झेलबाद झाला.
तत्पूर्वी हैदराबदने नाणेफेक गमाल्यामुळे प्रथम फलंदाजी केली. होम ग्राउंडवर हैदराबादसाठी एकडा हेनरिक क्लासेन मोठी खेळी करू शकला. क्लासेनने49 चेंडूत आपले शतक साकारले. एकूण 51 चेंडू खेळून 8 चौकार आणि 6 षटकारंच्या मदतीने त्याने 104 धावांची खेळी या सामन्यात केली. हॅरी ब्रुक याने 19 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
गोलंदाजी विभागात आरसीबीसाठी मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तर मायकल ब्रेसवेल याने दोन विकेट्स घेतल्या. हैदराबादच्या गोलंदाजीवेळी एकूण दोनच विकेट पडल्या. विराटची विकेट भूवनेश्वरला, तर फाफची विकेट टी नटराजनला मिळाली.
(RCB defeated SRH by eight wickets and keep playoff hopes alive!)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचा विलक्षण षटकार! 19 वर्षीय गोलंदाजाचा चेंडू 103 मीटर लांब मारला, पाहा व्हिडिओ
सनरायझर्स हैदराबादसाठी शतक करणारा चौथा फलंदाज ठरला हेनरिक क्लासेन! अवघ्या 49 चेंडूत केली कामगिरी