आयपीएल २०२१ च्या उर्वरित टप्प्याचे बिगुल लवकरच वाजणार आहे. फ्रँचायझींमध्ये कोविड-१९ च्या प्रकरणामुळे भारतात खेळला गेलेला आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा रद्द अर्ध्यातून करण्यात आला आहे. कडक बायो बबल असूनही मे महिन्यात झालेल्या स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या कारणास्तव, आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत.
दोन वर्षांपासून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे दिवस आणि रात्र एकत्र केले आहेत. या लढ्यात काही कोरोना योद्ध्यांनीही आपले प्राण गमावले आहेत.
कोरोना योद्ध्यांनी दाखवलेल्या धैर्याला आणि त्यांच्या हिमतीला सलाम करण्यासाठी, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात लालऐवजी निळ्या रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या जर्सीचा रंग पीपीई किटच्या रंगाने प्रेरित होऊन घेतला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोविड संक्रमित लोकांवर उपचार करण्यासाठी वापरतात ही पीपीई किट वापरतात.
RCB to wear Blue Jersey v KKR on 20th
We at RCB are honoured to sport the Blue kit, that resembles the colour of the PPE kits of the frontline warriors, to pay tribute to their invaluable service while leading the fight against the Covid pandemic.#PlayBold #1Team1Fight pic.twitter.com/r0NPBdybAS
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 14, 2021
आरसीबीने नवी जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर संदेशासह प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये, कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त, एबी डिव्हिलियर्स, नवदीप सैनी, हर्षल पटेल, सचिन बेबी, देवदत्त पडिक्कल आणि पवन देशपांडे यांनी कोरोनाविरोधातील लढाई लढणाऱ्यांबद्दल आदर व्यक्त केला आहे, तसेच त्यांच्या धैर्याला सलाम केला आहे.
दरम्यान इंग्लडविरुद्धची कसोटी मालिका संपवून भारतीय संघातील रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहलीसारखे खेळाडू आधीच यूएईला पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा शनिवारी ११ सप्टेंबरला बुमराह आणि सूर्यकुमारसह चार्टर्ड विमानाने अबू धाबीला पोहोचला होता. आयपीएलचे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत आणि स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मितालीचे वनडे क्रमवारीतील ‘राज्य’ कायम, पण दक्षिण आफ्रिकेची ‘ही’ खेळाडू आली बरोबरीवर
मॅंचेस्टर कसोटी मुद्द्यावर अखेर झुकली ईसीबी? बीसीसीआयशी करू शकते चर्चा
टी२० विश्वचषकात रथी-महारथी प्रशिक्षकांना भारतीय म्हणून एकटे शास्त्री गुरुजीच देणार टक्कर