मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तिसर्या सामन्यात सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने पदार्पणातच सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध दमदार फलंदाजी केली. यावेळी त्याने अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत पदार्पण सामन्यात धमाकेदार अर्धशतक झळकावणारा देवदत्त पडिक्कल आहे तरी कोण ते जाणून घेऊया.
या सामन्यात देवदत्तने 42 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 56 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ऍरॉन फिंच (29) आणि देवदत्त पडिक्कल( 56) यांच्या सलामीच्या जोडीने सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये 90 धावांची भागीदारी झाली.
गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्याने देवदत्तने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवदत्त हा स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळतो. त्याचे गेल्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीतून पदार्पण झाले होते.
विजय हजारे ट्रॉफी 2019/20 मध्ये देवदत्तने केवळ 11 डावांमध्ये 67.66 च्या सरासरीने 609 धावा केल्या. यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत देवदत्तच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 12 टी20 सामन्यात 175.75 च्या स्ट्राइक रेटने 580 धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. 20 वर्षीय देवदत्तने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 900 पेक्षा जास्त धावा केल्या. अ दर्जाच्या सामन्यातील त्याची सरासरी 60च्या जवळपास आहे. देवदत्तने रणजी पदार्पण, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत पदार्पणात अर्धशतक ठोकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सनरायझर्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; हा खेळाडू आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर
-वॉर्नर, विलियम्सन, भुवनेश्वर म्हणतात आम्हीच होणार यंदाचा आयपीएल विजेता; हैदराबाद संघ मिळवणार…
-पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज
-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं
-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा