रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील उपांत्य सामना फारच रोमांचक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेली ही लढत आरसीबीने 5 धावांनी जिंकली. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 12 धावा हव्या होत्या. पण आशा शोभना हिने टाकलेला गुगली मुंबई इंडियन्सच्या फलंदाज खेळू शकल्या नाहीत. परिणामी आरसीबीने डब्ल्यूटीसी 2024च्या अंतिम सामन्यात धडक दिली.
आरसीबीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सच्या नुकसानावर 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ 136 धावांचा पाठलाग करताना 130 धावांवर गुंडाळला गेला. आरसीबीसाठी शेवटच्या षटकात गोंलंदाजी करताना आशा शोभना हिने अप्रतिम प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. तिने शेवटच्या षटकात तिने पूजा वस्त्राकर हिची विकेट देखील घेतली.
आरसीबीसाठी या सामन्यात एलिस पेरी हिने 66 धावांची सर्वोत्तम खेळी केली. कर्णधार स्मृती मंधाना आणि शोफिया डिव्हाईन यांनी प्रत्येकी 10-10 विकेट्स घेतल्या. दिशा कासट शुन्यावर बाद झाली, तर रिचा घोष हिने 14 धावांची खेळी केली. सोफी मोलिनक्स 11 धावांवर विकेट गमावली. जॉर्जिया वेअरहॅम 18* आणि श्रेयांका पाटील हिने 3* धावा केल्या. हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, सायका इशाक यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
The celebrations from Ellyse Perry after the win.
– She is the queen, she deserves everything! 🫡❤️ pic.twitter.com/ikdFIJIhUd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 15, 2024
प्रत्युत्तरात आरसीबीसाठी श्रेयांका पाटील हिने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. एलिस पेरी, सोफी डिवाईन, जॉर्जिया वेअरहॅम आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मुंबई इंडियन्ससाठी यास्तिका भाटिया हिने सर्वाधिक 19, तर एली मॅथ्यूजने 15 धावांवर विकेट गमावली. नेट सायव्हर ब्रांट 23, तर कर्णधार हरमनप्रीत कौर 33 धावांवर बाद झाल्या. सजना सजीवन 1 आणि पूजा वस्त्राकर 4 धावांनी बाद झाल्या. अमेलिया केर 27* आणि आणि अमनजोत कौर 1* धावांवर नाबाद राहिल्या. (RCB Won by 5 Runs and will face Delhi Capitals in the WPL 2024 Finals.)
महत्वाच्या बातम्या –
नंदुरबार संघाचा विजयी चौकार, तर सांगली, कोल्हापूर, पालघर संघाचा तिसरा विजय
पंतचा सराव पाहून दिल्ली कॅपिटल्सचे कोच खुश! फॉर्म पाहून काय म्हणाले वाचाच । IPL 2024