---Advertisement---

IPL Auction: पंजाबकडे सर्वाधिक तर लखनऊकडे सर्वात कमी रक्कम, पाहा दुसऱ्या दिवसासाठी सर्व संघांची शिल्लक रक्कम

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 9:32 AM
ipl-auctions
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेसाठी मेगा ऑक्शन (Ipl mega auction)  सुरुवात झाली आहे. मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवसाची बोली १२ फेब्रुवारी रोजी लावण्यात आली. तर दुसऱ्या दिवसाची बोली १३ फेब्रुवारी रोजी लावण्यात येणार आहे. या उत्साहाच्या वातावरणात काही खेळाडू कोट्यवधी झाले तर काही दिग्गज खेळाडूंना देखील खाली हात परतावे लागले आहे.

मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवसाची सुरुवात १० मार्की खेळाडूंवर बोली लावण्यापासून झाली. यामध्ये श्रेयस अय्यरवर सर्वाधिक १२ कोटींपेक्षा जास्तीची बोली लागली तर, पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाचा खेळाडू ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने ईशान किशनवर १५ कोटी २५ लाखांची बोली लावली. तर लखनऊ सुपर जायंट्सने आवेश खानला १० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

तसेच श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा सह आणखी काही खेळाडू होते, ज्यांना आपल्या संघात स्थान देण्यासाठी फ्रँचायजिंनी मनसोक्त बोली लावली. परंतु स्टीव्ह स्मिथ, सुरेश रैना आणि डेविड मिलर सारखे काही दिग्गज खेळाडू देखील होते, ज्यांना एकही खरिददार मिळाला नाही. या खेळाडूंवर दुसऱ्या दिवशी बोली लावली जाऊ शकते. पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंवर बोली लागली. तर १० संघांनी एकूण ३,८८,१०,००,००० इतकी रक्कम खर्च केली आहे.

आयपीएल मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवसासाठी फ्रँचायजिंची शिल्लक रक्कम

मुंबई इंडियन्स :२७.८५ कोटी

चेन्नई सुपर किंग्ज : २०.४५ कोटी

पंजाब किंग्ज : २८.६५ कोटी

सनरायझर्स हैदराबाद : २०.१५ कोटी

राजस्थान रॉयल्स : १२.१५ कोटी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: ९.२५ कोटी

गुजरात टायटंस : १८.८५ कोटी

कोलकाता नाईट रायडर्स : १२.६५ कोटी

दिल्ली कॅपिटल्स :१६. ५ कोटी.

लखनऊ सुपरजायंट्स : ६.९ कोटी

महत्वाच्या बातम्या:

अनपेक्षित गोष्ट घडल्याने घाबरली शाहरुखची सुहाना! फोटो होतोय व्हायरल

मोठ्या वादानंतर कृणाल आणि हुडा पुन्हा खेळणार एकाच संघात ! सोशलमीडियावर उमटल्या अशा प्रतिक्रिया

‘गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस’, श्रेयस अय्यरने मांडली व्यथा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---