सध्या बर्मिंघम येथे राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिक्रेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्या संघाविरुद्ध होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग हिने आपली सहयोगी खेळाडू पूजा वस्त्राकर हिची कमी जाणवल्याचे सांगितले.
भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने शुक्रवारी सांगितले की, “गेल्या एका महिन्यात त्याने केलेल्या वेगवान आणि झटपट कामाचा फायदा मला मिळत आहे.” राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने बंगळुरू येथील एनसीएमध्ये सराव केला होता. गेल्या वर्षी भारताकडून पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज रेणुकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात १८ धावांत चार बळी घेतले. मात्र, संघाला ३ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय महिला संघाने फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ गडी राखून लक्ष्य गाठले.
सामन्यानंतर रेणुका सिंह म्हणाली की, “गेल्या एक महिन्यापासून मी माझ्या फिटनेसवर काम करत होते. आमचे फिटनेस कॅम्प होते, ज्यामध्ये मी माझा वेग, चपळता आणि तग धरण्याची क्षमता यावर काम केले. मी एक वेगवान गोलंदाज आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याचा मला खूप फायदा झाला.” कोविड-१९ संसर्गामुळे बाहेर असलेली गोलंदाजी अष्टपैलू पूजा वस्त्राकर या सामन्यात हुकली. रेणुकाने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
आमच्याकडे फक्त २ वेगवान गोलंदाज होते
ती म्हणाली की, “भारताकडे फक्त २ वेगवान गोलंदाज आहेत, पण आजची परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती. आम्हांला पूजाची खूप कमतरता जाणवत होती.” आता रविवारी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी ८ संघांना २ गटात विभागले गेले आहेत. भारताच्या गटातील आणखी दोन संघ पाकिस्तान आणि बार्बाडोस आहेत.पाकिस्तान आणि बार्बाडोस यांच्यात शुक्रवारी रात्री सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत नंबर-१ वर पोहोचू शकतो. दुसऱ्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांना स्थान मिळाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकच्या अंगात संचारली ‘कॅरेबियन पॉवर!’ विंडीज संघाविरुद्ध ‘एवढ्या’ स्ट्राईक रेटने केल्या धावा
‘एक अर्धशतक अन् दोन विक्रम!’ रोहित शर्माने विराट कोहलीसह आणखी एका दिग्गजाला टाकले मागे
आधी सिक्स, फोर अन् मग डायरेक्ट घरचा रस्ता! पाहा भारतीय गोलंदाजाचा जोरदार कमबॅक