भारताचा महिला क्रिकेट संघ कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games) उपांत्य फेरीत पोहोचला आहे. बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या २२व्या हंगामात भारताची कामगिरी उत्तम राहिली आहे. अ गटातील भारताने शेवटच्या साखळी सामन्यात बार्बाडोसला (INDvsBAR) १०० धावांनी पराभूत केले. या विजयाबरोबरच संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेत भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुरने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली आहे.
बार्बाडोस विरुद्धच्या सामन्यात रेणुका सिंग ठाकुर (Renuka Singh Thakur) हिने २.५०च्या इकॉनॉमी रेटने ४ षटके टाकली आहेत. यावेळी तिने १० धावा देताना ४ विकेट्स घेतल्या आहेत. तिने डायंड्रा डॉटीनला शून्यावर बाद केले. याबरोबरच भारताने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विरोधी संघाची शून्य धावसंख्या असताना विकेट घेणे अशी कामगिरी केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध असा पराक्रम केला आहे.
रेणुकाने बार्बोडोसची कर्णधार हॅली मॅथ्यूजला ९ धावांवर असताना शेफाली वर्माकरवी झेलबाद केले. तर विकेटकीपर केसिया नाईटला त्रिफळाचीत केले. तसेच आलियाह ऍलेनेलाही शून्यावरच बाद केले. याबरोबरच पुन्हा एकदा पहिल्या चार विकेट तिनेच घेण्याचा पराक्रम केला आहे.
The Swing Queen 👑
Watch the highlights as Renuka Thakur produces a fiery spell against Barbados in a crucial match in #CWG2022 🔥#BirminghamMeinJitegaHindustanHamara 🫶#B2022 #SirfSonyPeDikhega #SonySportsNetwork pic.twitter.com/YXiWymR1y9
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 3, 2022
या स्पर्धेत रेणुकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ४ विकेट्स घेतल्या होत्या. तिची या स्पर्धेतील गोलंदाजी उल्लेखनीय ठरत आहे. तिने पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेण्याचा सपाटाच लावला असल्याने विरोधी संघाची झोपच उडाली आहे, अशी अप्रतिम गोलंदाजी तिने केली आहे. तसेच ती ३ सामन्यांत ९ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
"The dream Commonwealth Games start for her and for India!"
The first ever #CommonwealthGames Cricket T20 match did not disappoint with magic like this from @WeAreTeamIndia. 🏏#B2022 | @ICC pic.twitter.com/fxohWeAWrq
— Commonwealth Sport (@thecgf) July 29, 2022
रेणुकाच्या गोलंदाजीने भारताला या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील नववाच टी२० सामना खेळणाऱ्या रेणुकाने मागील वर्षी संघात पदार्पण केले आहे. आतापर्यंत तिने एका सामन्यात चार विकेट्स घेण्याची कामगिरी दोनदा केली आहे. ह्या दोन्ही कामगिरी तिने कॉमनवेल्थ स्पर्धेतच केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG 2022 | भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच, वेटलिफ्टिंगमध्ये गुरदीपने जिंकले दहावे पदक
तुलिका मानने ज्यूडोमध्ये भारताला मिळवून दिले सिल्वर मेडल, वाचा तिचा कॉमनवेल्थमधील प्रवास
CWG 2022: टीम इंडियाची उपांत्य फेरीत धमाकेदार एंट्री! जेमिमाह, रेणुकाने केली विशेष कामगिरी