मागच्या वर्षीचा रणजी ट्रॉफी विजेता संघ मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी चषक खेळला गेला. 1 मार्च रोजी सुरू झालेला हा सामना पाचव्या दिवशी निकाली निघला. मध्य प्रदेशला 238 धावांनी धूळ चारत रेस्ट ऑफ इंडियाने इराणी चषक उंचापला. यशस्वी जयस्वाल याचे या सामन्यातील प्रदर्शन जबरदस्त राहिले. त्याने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱ्या डावात शतक करून रेस्ट ऑफ इंडियाचा विजय सोपा केला.
दरम्यान, जशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal ) याने या ईरानी चषकाच्या सामन्यात एकूण 357 धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात जयस्वालने 213, तर दुसऱ्या डावात 144 धावा केल्या. या अप्रतिम खेळीसाठी जयस्वालला सामनावीर म्हणून निवडले गेले. रेस्ट ऑफ इंडियाचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) संघासाठी दोन्ही डावात पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दोन्ही वेळी स्वस्तात बाद झाला. अगरवालकडून सलामीवीराच्या रूपात मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, मात्र त्याने पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 0 धावा करून विकेट गमावली. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन याने सामन्याच्या पहिल्या डावात 154 धावांची महत्वपूर्ण खेळी करत जयस्वालसोबत मोठी भागीदारी केली. तसेच यश धूल (54) यानेही संघासाठी पहिल्या डावात अर्धशतक केले. खेळाडूंनी दिलेल्या यागदोनाच्या जोरावर पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडिया संघाने 484 धावा साकारल्या.
That winning feeling 😃👌#IraniCup | #MPvROI | @mastercardindia
Scorecard 👉 https://t.co/UMUCM30e11 pic.twitter.com/5Nxt4DhLXg
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 5, 2023
प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघ मात्र पहिल्या डावात 294 धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या डावात मध्यप्रदेशसाठी हर्ष गवळी (54) याने अर्धशतक, तर अमान सोलंकी (109) याने शतक ठोकले. सारांश जैन यानेही 66 धावांची खेळी या डावात मध्ये प्रदेशसाठी केली. पहिल्या डावात मध्य प्रदेशने घेतलेली आघाडी मोठी होती, जी दुसऱ्या डावानंतर अधिकड मोठी झाली. दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडिया संघाने 246 धावा कुटल्या. यायवेळी जयस्वाल सोडला तर एकही फलंदाज अर्धशतकीय योगदान देऊ शकला नाही. शेवटच्या डावात मध्य प्रदेशला विजयासाठी 437 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण संघ अवघ्या 198 धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील रेस्ट ऑफ इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन करून संघाला विजयापर्यंत पोहोचवले.
हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक सामन्यात स्मृती मंधानाच्या आरसीबीने जिंकली नाणेफेक, दिल्ली पहिल्यांदा करणार फलंदाजी
क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच देणारे ‘बॉब वूल्मर’, पाकिस्तानचे हेड कोच असतानाच झालेला रहस्यमयी मृत्यू