सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान इंदोर येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना अवघ्या दोनच दिवसात अनेक चढउतारांनी भरलेला दिसून आला. ऑस्ट्रेलियन संघाने अजून तरी या सामन्यात वर्चस्व गाजवले आहे. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या कसोटी कारकीर्दची चिंता सतावतेय.
हा सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो सहभागी झाला. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मायदेशी परतावे लागले. या दोन सामन्यांच्या तीन डावांमध्ये तो केवळ 1, 10 व 15 अशा धावा करू शकला होता. त्याच्या याच खराब कामगिरीमुळे आगामी काळात त्याची ऑस्ट्रेलिया कसोटी संघात जागा बनणार का? असा सवाल पॉंटिंग याला पडला आहे.
एका मुलाखतीत बोलताना पॉंटिंग म्हणाला,
“वॉर्नर याचे भविष्य काय असा प्रश्न मला सध्या पडतोय? मागील काही काळापासून त्याने धावा केल्या नाहीत. अशात ऍशेस मालिकेसाठी त्याला संघात कदाचित जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. तो वयाच्या त्या टप्प्यावर आहे जेथे फॉर्म हमखास खराब होतो. मला स्वतःला देखील याचा अनुभव आलेला. माझ्या मते त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्ती घ्यायला हवी होती. मेलबर्न येथे त्याने द्विशतक केलेले तर त्यानंतर आपल्या घरच्या सिडनी येथील मैदानावर त्याने पुढील सामना खेळलेला. ती निवृत्तीची योग्य वेळ ठरली असती. आता कदाचित त्याला मनासारखी निवृत्ती घेता येणार नाही”
वॉर्नरची इंग्लंडमधील कामगिरी देखील फारशी चांगली नाही. त्यामुळे तो आता पुढे ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा भाग असेल का याबाबत अनेक जण प्रश्न विचारताना दिसत आहेत.
(Ricky Ponting Doubtful For David Warner Test Carrier He Suggest Retirement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर