---Advertisement---

निवृत्ती नाही, अणखी बरच काम बाकी! पहा रोहित शर्माच्या निर्णयामागचे खरे कारण

---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं एका वर्षाच्या आता दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकून इतर संघांना जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. भारतीय संघानं 2024चा टी20 विश्वचषक जिंकला असला तरी, आता संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपदही जिंकलं आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी, रोहित एकदिवसीय क्रिकेटलाही निरोप देईल अशी अटकळ होती, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याने स्पष्ट केलं की सध्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. आता, कर्णधार म्हणून 4 आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या रिकी पॉन्टिंगनं त्याच्या निर्णयावर एक विधान दिले आहे, ज्यामध्ये त्याने रोहितचे कोणते काम अद्याप अपूर्ण आहे, ज्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही हे सांगितले आहे.

रोहित शर्माच्या निर्णयावर रिकी पॉन्टिंगने दिलेलं मत खूप रोचक आहे. तो म्हणला की, जेव्हा एखादा खेळाडू आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा लोक त्याच्या निवृत्तीबद्दल अंदाज लावायला लागतात. पण रोहितनं आपल्या खेळानं आणि नेतृत्वानं हे सिद्ध केलं आहे की त्याच्याकडे अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहितनं जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याने लोकांना हे दाखवून द्यायचं ठरवलं की, “मी अजूनही टॉप लेव्हलचा क्रिकेट खेळू शकतो!” त्याच्या निर्णयाचा अर्थ असा की, तो फक्त सध्याच्या क्षणाचा विचार करत नाही, तर 2027 च्या वनडे विश्वचषकावरही लक्ष ठेवून आहे.

संघाचं नेतृत्व करायला आणि भारतासाठी खेळायला त्याला आनंद मिळतो, हे त्याच्या प्रत्येक हालचालीत दिसतं. त्यामुळे रोहित लवकर निवृत्ती घेणार, असे मानणाऱ्यांनी थोडं थांबायला हवं. कारण, हा हिटमॅनमध्ये आणखी बरच क्रिकेट शिल्लक आहे.

रिकी पॉन्टिंगनं आपल्या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, मला वाटते की रोहितच्या मनात ही गोष्ट राहिली असेल की त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला होता. यामुळे त्याला आणखी एकदा प्रयत्न करायचा असेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तो ज्या पद्धतीने खेळला, त्यामुळे तो चुकला असे म्हणता येणार नाही. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---