सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा हंगाम पार पडत आहे. या स्पर्धेत नवीन वर्षाच्या आदल्या संध्याकाळी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग आणि वेस्ट इंडिज संघाचे महान खेळाडू ब्रायन लारा उपस्थित होते. ते या स्पर्धेतील सामन्याचे समालोचक म्हणून उपस्थित होते. यावेळी पॉंटिंगने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
रिकी पाँटिंग आणि ब्रायन लारा हे आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करताना एकमेकांविरुद्ध खूप सारे सामने खेळले आहेत. त्यामुळे बिग बॅश लीगमध्ये समालोचक म्हणून दोघे सहभागी झाले होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने जुन्या आठवणींना उजाळा देताना एक किस्सा सांगितला. खूप वर्षापूर्वी एकदा पॉंटिंगने लारा फसवण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्या मते ब्रायन लारा फलंदाजी करताना एक वेडेपणा करत होते. त्यावेळी पाँटिंगने ब्रायन लारा खूप स्लेजींग केली होती. त्यावेळी ब्रायन लारा हे क्रोधित होवून ऑस्ट्रेलिया संघावर भारी पडले होते. ब्रायन लारा यांनी त्या सामन्यात एॅडलेड येथे शतक ठोकले होते. त्यानंतर आता 51 वर्षीय ब्रायन लारा यांनी त्यावेळी प्रेरित करण्यासाठी पाँटिंगच्या जर्सीवर हस्ताक्षर केले होते. त्याचबरोबर प्रेरित करण्यासाठी आभार व्यक्त केले.
पाँटिंग म्हणाले, “आम्ही एॅडलेडमध्ये एक कसोटी सामना खेळत होतो आणि ते फलंदाजी करताना एकही फटका मारत नव्हते. ते फक्त 30-40 चेंडू फक्त खेळत चालले होते. तेव्हा मी म्हणालो, ब्रायन आज तुम्ही हलक्या फुलक्या पद्धतीने मामला सेट करत आहात. तुम्ही सगळ्या खेळाडूंना पेंग आणत आहात. एका तासांनंतर ते 180 धावांवर नाबाद होते. खेळाच्या शेवटी त्यांनी पाँटिंगच्या जर्सीवर हस्ताक्षर केले. त्याचबरोबर प्रेरित करण्यासाठी आभार मानले.” हा सर्व किस्सा पाँटिंगने समालोचन करताना सांगितला.
एॅडलेड मध्ये कसोटी क्रिकेट खेळताना ब्रायन लारांचे शानदार विक्रम आहेत. त्यांनी या ठिकाणी आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात 1993 मध्ये 52 धावांची खेळी केली होती. त्यांनी 1997 मध्ये दुसर्या डावात 78 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तीन वर्षानी 2000 मध्ये 182 धावा केल्या होत्या. परंतु हा सामना वेस्ट इंडिज संघाने गमावला होता.
ब्रायन लारांनी 2005 मध्ये 22 चौकारांच्या मदतीने 226 धावा केल्या होत्या. ज्यामधे त्यांनी 75.74 च्या स्ट्राईक रेटने खेळी साकारली होती. तरी सुद्धा हा सामना वेस्ट इंडिज संघाने गमावला होता. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाचा 7 विकेट्स पराभव झाला होता. एॅडलेडमध्ये चार कसोटी सामन्यात त्यांनी 76.25 च्या सरासरीने 610 धावा केल्या होत्या.
ब्रायन लारांनी निवृत्ती घेवून 13 वर्षे झाले आहेत, परंतु त्यांचा कसोटी क्रिकेट मधील 400 धावांचा विक्रम अजून अबाधित आहे. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 53 शतके केली आहेत आणि 111 अर्धशतके साकारली आहेत. त्याचबरोबर 21,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड बाबा झालो रे!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या घरी हलला पाळणा, पोस्टद्वारे दिली खुशखबर
ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संध