fbpx
Thursday, February 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
in टॉप बातम्या, क्रिकेट, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/@ICC

Photo Courtesy: Twitter/@ICC


नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला भारताकडून आपल्याच देशात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही नवख्या भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले. ऑस्ट्रेलियाची या मालिकेत निष्प्रभ ठरलेली गोलंदाजी हे त्यांच्या पराभवाचे एक मुख्य कारण होते.

त्यामुळे आता त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होते आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनेही उडी घेतली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर टीका केली आहे. स्टार्क चेंडू स्विंग करू शकत नसेल तर त्याच्या जागी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या, अशी मागणी पॉंटिंगने केली आहे.

“दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या गोलंदाजाला द्या संधी”

मिचेल स्टार्कने भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत चार सामन्यात मिळून केवळ ११ गडी बाद केले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तीनच सामने खेळून देखील १३ बळी पटकाविले. स्टार्कची गोलंदाजी पूर्ण मालिकेत प्रभावहीन वाटली. म्हणूनच पॉंटिंगने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत स्टार्कच्या जागी इतर कुठल्या गोलंदाजाला संधी द्यावी, असे विधान केले आहे.

एका वेबसाईटशी बोलताना पॉंटिंग म्हणाला, “ही तंत्राची बाब आहे. कदाचित तो खूप जास्त थकला असेल. त्याला विश्रांतीची गरज असेल. पण कोचने तो चेंडू स्विंग करतो आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवे. कारण दक्षिण आफ्रिकेत चेंडू अधिक स्विंग होत असतो. आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे की चेंडू स्विंग होऊ लागल्यावर स्टार्क अतिशय धोकादायक गोलंदाज सिद्ध होतो.”

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अतिशय महत्वाची आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असल्यास त्यांना या मालिकेत विजय आवश्यक आहे. त्यामुळे पॉंटिंगचा सल्ला ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन मनावर घेणार का, हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा

बाऊंसर चेंडूवर येणार बंदी ? हे आहे कारण

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची आझम कॅम्पस ला भेट 


Previous Post

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

Next Post

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

लीचची फिरकी अन् रोहितची गिरकी! फक्त ३ कसोटी सामन्यात चक्क ४ वेळा धाडलंय तंबूत 

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

INDvENG 3rd Test Live: रुट, लीचच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज गडगडले; भारताचा पहिला डाव १४५ धावावंर संपुष्टात

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCIDomestic
क्रिकेट

एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक 

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/ANI
इंग्लंडचा भारत दौरा

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’

February 25, 2021
Next Post

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! 'या' ठिकाणी होणार लिलाव

Photo Curtsey: Twitter/ICC

"इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 'ही' गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन", अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

"टी२० मालिका विजयानंतर विराटच्या 'त्या' कृत्याने डोळ्यात पाणी आणलं", नटराजनने व्यक्त केल्या भावना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.