आयपीएलमध्ये नावारूपाला आलेला उत्तर प्रदेशचा युवा फलंदाज रिंकू सिंग याने नुकतेच भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. आयर्लंड दौऱ्यावर एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर त्याने त्यात जबरदस्त कामगिरी करत सामनावीर पुरस्कार जिंकलेला. त्यानंतर आता तो प्रथमच आयोजित होत असलेल्या उत्तर प्रदेश टी20 लीग या स्पर्धेत खेळताना दिसत आहे. गुरुवारी (31 ऑगस्ट) झालेल्या या स्पर्धेतील एका सामन्यात त्याने सुपर ओव्हरमध्ये सलग तीन षटकार ठोकून आपल्या संघाला विजयी केले.
17 runs needed in the Super over.
Rinku Singh says "No problem".
He smashed 0, 6, 6, 6 in the first 4 balls – What a star. pic.twitter.com/INobp7n8dt
— Johns. (@CricCrazyJohns) August 31, 2023
युपी टी20 लीग स्पर्धेत गुरुवारी काशी रुद्रा विरुद्ध मेरठ मॅवेरिक्स असा सामना खेळला गेला. यामध्ये दोन्ही संघांनी निर्धारित 20 षटकांत 181 धावाच केल्या. त्यानंतर या सामन्यासा निकाल सुपर ओव्हरमध्ये घेण्यात आला. काशी संघाने प्रथम फलंदाजी करताना 16 धावा केल्या. त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी रिंकू सिंग मैदानात उतरला.
काशी संघाकडून फिरकीपटू शिवा सिंह हा गोलंदाजी करत होता. रिंकू पहिल्या चेंडूवर एकही धाव घेऊ शकला. दुसऱ्या चेंडूवर त्याने लॉंग ऑफच्या दिशेने षटकार खेचला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने लॉंग ऑफ आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा समोरच्या दिशेने षटकार मारत आपल्या संघाला विजयी केले.
यावर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना त्याने गुजरात विरुद्ध अखेरच्या षटकात पाच षटकार मारून आपल्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. याच कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात देखील त्याने तुफानी फटकेबाजी करताना चार षटकार लगावलेले.
(Rinku Singh Hits Consecutive 3 Sixes In Super Over At UP T20 League)
हेही वाचाच-
लंकन सिहांनी शांत केले बांगला टायगर्स! श्रीलंकेची शानदार विजयाने सुरुवात
IPL फायनलमध्ये CSKचा घाम काढणाऱ्या खेळाडूचा मोठा निर्णय, विदेशी संघासोबत केला ‘एवढ्या’ सामन्यांचा करार