रविवारी (9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंग याने आयपीएलमध्ये अविश्वसनीय खेळी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारून रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला या सामन्यात 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. रिंकू सिंग याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचवेळी सामन्यानंतर रिंकूने मनाचा मोठापणा दाखवत गोलंदाज यश दयाल याला स्वतः मेसेज केला.
धावांचा पाठलाग करताना रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा कुटल्या. विशेष म्हणजे शेवटच्या सात चेंडूंपैकी सहा चेंडूंवर त्याने षटकार मारले. शेवटच्या षटकात विजयासाठी केकेआरला 29 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर उमेश यादव याने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. पुढच्या पाचही चेंडूवर रिंकूने पाच षटकार मारत केकेआरला जबरदस्त विजय मिळवून दिला.
Chin up, lad. Just a hard day at the office, happens to the best of players in cricket. You’re a champion, Yash, and you’re gonna come back strong 💜🫂@gujarat_titans pic.twitter.com/M0aOQEtlsx
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 9, 2023
गुजरात टायटन्ससाठी हे शेवटचे षटक डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याने टाकले. मागील हंगाम गाजवलेल्या यशला ही घटना अनपेक्षित होती. यश या खराब कामगिरीनंतर निराश झालेला दिसला होता. मात्र, स्वतः रिंकू नेत्याला मेसेज करत त्याला धीर दिला. रिंकूने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले,
‘मी रात्री यशला मेसेज केला. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. मागील वर्षी तू उत्कृष्ट खेळला होता. लवकरच तू पुन्हा एकदा तुझी करामत दाखवशील. असे बोलून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.”
याव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर देखील यशचा उत्साह वाढवणारे ट्विट केले. यश आणि रिंकू देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे एकत्रितपणे प्रतिनिधित्व करतात. मागील वर्षी गुजरातने जिंकलेल्या आयपीएल विजेचेपदात यशचा मोठा वाटा होता.
(Rinku Singh Text Yash Dayal After Five Sixes In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये धमाका करणारे सात भारतीय फलंदाज, मागचा संपूर्ण आठवडा यांच्याच नावावर
पंजाबला नमवत सनरायझर्सने खोलले विजयाचे खाते! मार्कंडे-त्रिपाठी ठरले नायक