भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. वनडे व टी२० मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला (बॉर्डर- गावसकर ट्रॉफी) ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशी परतेल. विराटची पत्नी अनुष्का शर्मा पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याने, विराट पालकत्व रजा घेऊन आपल्या पत्नीसमवेत राहणार आहे. मात्र, विराट या मालिकेत एकमात्र कसोटी खेळणार असल्याने, त्या सामन्याच्या तिकिटांची मोठी मागणी वाढली आहे.
मेलबर्न येथील कॅफे मालक अंगद सिंग ओबेरॉय हे ऑस्ट्रेलियात ‘स्वामी आर्मी’ या भारतीय क्रिकेट शौकीनांच्या समूहाचे संचालन करतात. ओबेरॉय यांच्या मते, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांसाठी प्रेक्षक मोठ्याप्रमाणात आतुर आहेत. त्यातल्या त्यात, पहिल्या ऍडलेड कसोटीसाठीच्या तिकीटांना मागणी वाढली आहे.
सिडनी हेरॉल्ड मॉर्निंगने ओबेरॉय यांच्या हवाल्याने खबर दिली आहे की, “दिवस-रात्र कसोटीबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या कसोटीसाठीच्या तिकीटांना मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी, लॉजिस्टिक्स व टिकटींगची कामे एकत्र येण्यात अडचणी येत आहेत. आमचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाशी बोलणे सुरू आहे. आम्ही २५,००० तिकीटांची मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे. मात्र, पुढे काय होईल ते माहित नाही.”
ओबेरॉय यांनी कोविड-१९ मुळे बदललेल्या नव्या नियमांचा उल्लेख करताना म्हटले, “कोविड-१९ च्या भीतीमुळे किती लोक येतील याविषयी आम्हाला शंका होती. त्यामुळे आम्ही फक्त शेकड्यात तिकिटे मागवलेली. भारतातून येणाऱ्या चाहत्यांना ऑस्ट्रेलियात येण्यासाठी काहीश्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, कोविडच्या नियमात आता थोडी सूट मिळाली आहे.”
ऍडलेड येथील पहिल्या कसोटीनंतर विराट भारताकडे रवाना होईल. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करू शकतो. पहिल्या कसोटीसाठी मैदानाच्या एकूण क्षमतेच्या निमपट प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, पहिल्या कसोटीसाठी २७,००० प्रेक्षक मैदानात येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
-संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर