---Advertisement---

‘लवकर आऊट हो’, पंतने कुलदीपला पटकन बाद होण्यास सांगितले; मग फिरकीपटूने दिले मजेशीर उत्तर

rishabh pant kuldeep video
---Advertisement---

रिषभ पंत आणि स्टंप माइकचं नातं भारतीय क्रिकेटप्रेमींपासून लपून नाही! भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानावर यष्टीमागे नेहमी आपल्या मजेशीर वक्तव्यांनी तो खेळाडूंसह प्रेक्षकांचेही मनोरंजन करत असतो. दरम्यान दुलीप ट्रॉफी सामन्यात पंत आणि कुलदीप यादव यांच्यातील मजेदार संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंत त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू कुलदीपला लवकर बाद होण्यास सांगत आहे. त्याचवेळी कुलदीपने हसत पंतला मजेशीर उत्तरही दिले आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पंतची कामगिरी दमदार होती. त्याने केवळ यष्टिरक्षणातच चमकदार कामगिरी केली नाही तर त्याने फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आणि भारत ब संघासाठी दुसऱ्या डावात 61 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या संघाला 76 धावांनी विजय मिळवण्यात मोलाचे सहकार्य झाले. या सामन्यादरम्यान पंतने मैदानावर खूप मस्तीही केली.

खरे तर दुसऱ्या डावात कुलदीप भारत ब संघाच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पंतने कुलदीपची छेड काढत त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पंत यष्टीमागून म्हणाला, “त्याला एक-एक धावा घेऊ द्या, यासाठी जोरदार योजना आखण्यात आली आहे.” त्याबदल्यात कुलदीपने उत्तर दिले, “ठीक आहे यार, तू कशाला काळजी करतोय.” यावर पंत म्हणाला, “मग लवकर बाद हो ना,” त्यानंतर दोघेही हसू लागले. भारतीय खेळाडूंचे मैदानावरील हे गमतीशीर संभाषण चाहत्यांना कूप आवडले आहे.

दरम्यान भारतीय संघ आपल्या घरेलू हंगामाची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या महत्त्वाच्या मालिकेने करणार आहे. याआधी टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमधून कसोटी क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दीड वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीसीसीआय सोमवारी (09 सप्टेंबर) बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?
24 वर्ष…एकही पराभव नाही! बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये भारताचा तुफानी रेकॉर्ड; आकडेवारी खूपच धक्कादायक

दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---