भारत आणि इंग्लंड संघामध्ये पहिला कसोटी सामना बुधवारपासून (४ ऑगस्ट) सुरू झाला आहे. या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात दमदार झाली. भारताने पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडला १८३ धावांत सर्वबाद केले. तसेच दिवसाखेर बिनबाद २१ धावा केल्या. दरम्यान, पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यादरम्यान एक गमतीशीर घटना पाहायला मिळाली.
या सामन्यात इंग्लंड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण इंग्लंडला पहिला धक्का सामन्याच्या पाचव्याच चेंडूवर बसला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामीवीर रॉरी बर्न्सला शुन्यावर पायचीत केले. त्यानंतर २१ व्या षटकात जॅक क्रॉलीला २७ धावांवर मोहम्मद सिराजने माघारी धाडले. पण ही विकेट मिळण्यात पंतचेही योगदान होते.
झाले असे की पंचांनी सुरुवातीला क्रॉलीला नाबाद दिले होते. पण, त्यानंतर पंतने बराच वेळ कर्णधार विराट कोहलीला डीआरएस रिव्ह्यूसाठी मनवले. अखेर विराटने पंतचे ऐकले आणि डीआरएसची मागणी केली आणि त्यात क्रॉली बाद असल्याचे दिसले.
खरंतर याच षटकात तिसऱ्या चेंडूवर भारताने एक रिव्ह्यू गमावला होता. त्यानंतर तीन चेंडू झाल्यानंतर लगेचच रिव्ह्यूची मागणी करण्याच विराट चाचरत होता. मात्र, त्याला रिव्ह्यूसाठी पंतने खुप समजावले, अखेर २१ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतचे ऐकून विराटने रिव्ह्यू घेतला.
रिव्ह्यू घेण्याआधी विराटला असे वाटले की चेंडू बॅटच्या आतील बाजूला लागला नाही. पण पंतला विश्वास होता की चेंडूने बॅटला स्पर्श केला आहे आणि मग त्याने झेल घेतला आहे. विराट कोहलीने गोलंदाज सिराजलाही विचारले आणि त्यालाही पूर्ण खात्री नव्हती. पण पंत कोहलीला वारंवार डीआरएससाठी विचारत राहिला आणि शेवटी त्याने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये क्रॉली बाद झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विराट-पंत आणि भारतीय संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
Convincing level: RISHABH PANT!! 🔥
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Kohli pic.twitter.com/kgqXemxKhO
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2021
या विकेटनंतरही इंग्लंडच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ६४ धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने २९ आणि सॅम करनने नाबाद २७ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर शमीने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने २ आणि मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची तारिख समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
“तर आर अश्विन त्याचा फॉर्म गमावून बसेल”, मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केली भीती