Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्लंडविरूद्ध रिषभची पंतगिरी! ठोकले कारकिर्दीतील पहिले वनडे शतक

July 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मॅंचेस्टर येथे खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवत मालिका २-१ ने आपल्या नावे केली. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने संघ अडचणीत असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शानदार शतक झळकावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठरले.

कठीण परिस्थितीतून काढले संघाला बाहेर

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा काढल्या. त्यानंतर फक्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन व अनुभवी विराट कोहली हे केवळ ३८ धावांमध्ये माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंत व हार्दिक पंड्या ही जोडी जमली. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ७१ धावांची आक्रमक खेळी केली.

हार्दिक बाद झाल्यानंतरही रिषभने आपले आक्रमण कायम ठेवले. त्याने आपल्या २७ व्या सामन्यात आपले पहिले वनडे शतक पूर्ण केले. या शतकासाठी त्याने १०५ चेंडू घेतले. इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा तो केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक बनला. यापूर्वी राहुल द्रविड व के एल राहुल यांनी अशी कामगिरी केली होती. मँचेस्टर येथे वनडेत शतक करणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय आहे.

रिषभने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजयी रेषेपार नेले. त्याने शतकानंतर डेव्हिड विलीच्या षटकात सलग पाच चौकार ठोकत सामना भारताच्या पुढ्यात आणून ठेवला. रिषभने ११३ चेंडूवर १६ चौकार व दोन षटकारांच्या  मदतीने नाबाद १२५ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

हार्दिक रचिला पाया| रिषभ झालासे कळस; वनडे मालिकेवर टीम इंडियाचा कब्जा

MS Dhoni and Lungi Ngidi

धोनीबाबत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे मोठे विधान! म्हणाला, 'सामना जिंकण्यासाठी माझ्यावर विश्वास...'

indveng

सात वर्षांपासून इंग्लंडवर टीम इंडियाचीच 'सत्ता'! वाचा गर्व करणारी आकडेवारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143