आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उर्वरित ३१ सामने २७ दिवसांमध्ये खेळले जातील आणि स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. अशातच या दुसऱ्या टप्प्यातही आक्रमक फलंदाज रिषभ पंत हा कर्णधार म्हणून कायम राहणार असल्याचे दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केले आहे.
गेल्या काही काळापासून चर्चा होती की रिषभ पंतला कर्णधार पदावरून दूर करण्यात येईल आणि त्याच्या जागी पुन्हा श्रेयस अय्यरला संधी देण्यात येईल. पण या सगळ्या अफवा ठरल्या असून रिषभच दिल्लीचा कर्णधार राहणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने याबाबत ट्विट करून माहिती दिली की, रिषभच उर्वरित आयपीएल २०२१ मध्ये दिल्लीचा कर्णधार असेल. पंतला आयपीएल २०२१ च्या सुरुवातीला श्रेयस अय्यरच्या ऐवजी दिल्लीला कर्णधारपद देण्यात आले होते. कारण, माजी कर्णधार अय्यरला खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा खेळता आला नव्हता.
मात्र, हा हंगाम स्थगित झाल्याने अय्यरकडे दुखापतीतून सावरण्यास वेळ मिळाला आणि तो दुसऱ्या टप्प्यात पुनरागमन करण्यास सज्ज झाला. मात्र, दिल्लीने पंतकडेच कर्णधारपद कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 OFFICIAL STATEMENT 🚨
JSW-GMR co-owned Delhi Capitals today announced that Rishabh Pant will continue as Captain for the remainder of the #IPL2021 season.#YehHaiNayiDilli pic.twitter.com/yTp2CZHqYj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 16, 2021
आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीने आठपैकी सहा सामने जिंकत १२ गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल चेन्नईचा संघ आहे त्यांनी १० गुण मिळवले आहेत तर तिसऱ्या स्थानी आरसीबीचा संघ आहे. त्यांनी देखील १० गुण मिळवले आहेत, पण आरसीबीचा नेटरनरेट सीएसकेपेक्षा कमी असल्याने ते तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी आठ गुण मिळवून मुंबईचा संघ आहे.
तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असलेले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू रविवारी १२ सप्टेंबरला, इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या उर्वरित भागासाठी दुबईत दाखल झाले होते.
दुबईत आल्यावर कर्णधार रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि उमेश यादव यांच्यासह सर्व खेळाडूंची कोविडची चाचणी झाली. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले होते की, “खेळाडूंना आयपीएल प्रोटोकॉलनुसार सहा दिवसांच्या क्वारंटाईनची आवश्यकता असेल, या दरम्यान त्यांची तीन वेळा चाचणी केली जाईल. त्यानंतर, खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या उर्वरित संघात सामील होतील, जे आधीच या बायो-बबलचा भाग आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ
“सांत्वन करण्यासाठी अश्विनची विश्वचषकासाठी निवड”, भारतीय दिग्गजाचे महत्त्वपूर्ण विधान
‘अशी’ चार कारणे ज्यामुळे विराटने सोडले टी२० संघाचे नेतृत्व