---Advertisement---

रिषभ पंत आणि षटकारांच नातं काही खास

On: शुक्रवार, ऑक्टोबर 5, 2018 10:49 AM
---Advertisement---

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ रिषभ पंतनेही नाबाद अर्धशतक केले.

पंतने ६९ चेंडूंचा सामना करताना नाबाद ७४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ चौकार आणि तब्बल ४ षटकारांचा समावेश आहे.

त्याबरोबर पंतने एक खास पराक्रम केला आहे. त्याने कसोटीत पहिली धाव षटकार खेचत घेतली होती. त्यानंतर त्याने आपले पहिले कसोटी शतक षटकार खेचत केले होते. तसेच त्याने आज आपले पहिले अर्धशतकही षटकार खेचत पुर्ण केले.

जेमतेम चौथा सामना खेळत असलेल्या पंतने आजपर्यंत १० षटकार खेचले आहेत. आज त्याला चौथ्याच सामन्यात कसोटीतील दुसरे शतक करण्याची संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दुसऱ्या दिवशी काही मिनीटांतच कोहलीचा कसोटीत भीमपराक्रम

विंडीज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान

विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment