भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील अपयशी ठरला. मागच्या मोठ्या काळापासून रिषभ पंत त्याच्याकडून अपेक्षित असलेले खेळी करू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत पंत संघाच्या उपकर्णधाराच्या रूपात सहभागी झाला. मात्र, चाहत्यांची त्याने चांगलीच निराशा केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत रिषभ पंत (Rishabh Pant) अपयशी ठरला. या मालिकेत त्याला सलामीवारी जबाबदारी देखील सोपवली गेली होती, पण संघाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरला नाही. उभय संघांतील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शुक्रवारी (25 नोव्हेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 306 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ 47.1 षटकात अवघ्या तीन विकेट्सच्या नुकसानावर विजयी झाला.
रिषभ पंत या सामन्यात एकूण 23 चेंडू खेळला, ज्यामध्ये 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या आणि विकेट गमावली. या सामन्यात पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता आणि एकदा पुन्हा तो मोठी खेळी करू शकला नाही. तत्पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 6 आणि 11 धावांवर विकेट्स गमावली. या निराशाजनक प्रदर्शनानंतर पंतला संघात वारंवार मिळणाऱ्या संधीविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर शुक्रवारच्या खराब प्रदर्शनानंतर नेटकरी त्यांला चांगलेच ट्रोल करू लागले आहेत
#RishabhPant pant is a consistent player 🔥The future of Indian cricket & the most luckiest sport's person in the whole world now.Yesterday he scored 11 #SanjuSamson #INDvsNZ pic.twitter.com/nnNKrn0uLO
— Don Haku (@AbdulHakeemK6) November 23, 2022
#INDvsNZ #Pant #RishabhPant
Greatest batsman missed Century by Just 85 runs 🔥 pic.twitter.com/Y8NVqQMdHD— Mahi (@ursmahiiip) November 25, 2022
दरम्यान, एकदिवसीय मालिकेतील या पहिल्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी त्यांचे वरच्या फळीतील फलंदाज चांगले प्रदर्शन करू शकले. सलामीला आलेल्या शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे 72 आणि 50 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला क्षेयस अय्यर याने संघासाठी सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. न्यूझीलंडसाठी टिम साउदी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
Another opportunity wasted by Rishab Pant!!
Gotta feel sad for Samson…he deserves a chance to be in the playing 11.#tigerexch #indiacricket #RishabhPant #INDvsENG pic.twitter.com/V5nWEXS5UF— Tigerexch (@tigerexch) November 20, 2022
Pant is very dangerous t20 batsman#SanjuSamson #BCCI #INDvsNZ #RishabhPant#SanjuSamson pic.twitter.com/ZiYdkgK3Bu
— ms (@mrmeena97) November 23, 2022
न्यूझीलंड संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा त्यांचे सलामीवीर फलंदाज अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार केन विलियम्सन (94) आणि पाचव्या क्रमांकावर टिम लॅथम (145) यांनी संघासाठी 124 धावांची भागीदारी पार पाडली. लॅथम त्याच्या नाबाद 145 धावांच्या जोरावर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत जोडो’ यात्रेत दिसला विजेंदर सिंगचा स्वॅग! राहुल गांधींनीही मारला मिशीवर ताव
‘धवन नेहमीच स्पॉटलाइटपासून लांंब राहिला’, विराट-रोहितचे नाव घेत शास्त्रींचे मोठे विधान