आज (गुरुवार, १५ जुलै) रोजी इंग्लंड दौऱ्यावरील २३ सदस्यीय भारतीय संघातील २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळ्याची बातमी पुढे आली होती. मात्र या संक्रमित क्रिकेटपटूंची नावे अस्पष्ट होती. २० दिवसांच्या सुट्टीचा कालावधी संपवून सर्व भारतीय क्रिकेटपटू आज डर्हम येथे सराव सामन्यासाठी एकत्र जमणार आहेत. तत्पुर्वी हे वृत्त पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता त्या २ कोरोनाग्रस्त भारतीय क्रिकेटपटूंपैकी एकाचे नाव उघडकीस आले आहे. हा क्रिकेटपटू यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत असल्याचे समजत आहे.
स्पोर्ट्स तकमधील वृत्तानुसार, ‘इंग्लंडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २ भारतीयांपैकी एक जण रिषभ पंत आहे. त्याचा कोरोना अहवाल मागील आठवड्यातच पॉझिटिव्ह आला होता. आता तो एकांतवासात असून त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.’
Rishabh Pant is the player who has tested positive for COVID19 in England. (Reported By Sports Tak).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 15, 2021
Rishabh Pant tested positive for COVID19 around a week ago. He's asymptomatic and recovering well. (Reported By Sports Tak).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 15, 2021
आज २० दिवसांच्या सुट्टीवर गेलेले सर्व भारतीय क्रिकेटपटू डर्हम येथे सराव सामन्यासाठी एकत्र जमणार आहेत. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या क्रिकेटपटूंना त्यांचा विगलीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे पंत सराव सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. येत्या रविवारी त्याचा विगलीकरणाचा कालावधी पूर्ण होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळेल की नाही? हे अद्याप अस्पष्ट आहे. असे असले तरीही, अजून बीसीसीआयनेही यासंदर्भात कसलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-