भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात क्रिकेटविश्वासाठी थक्कादाय होता. शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास पंतचा भीषण अपघात झाला. अपघातात त्याची गाडी जळून खाक झाली असून पंतला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतग्रस्त पंत लवकर बरा होण्यासाठी जगभरातील दिग्गज प्रार्थना करत आहेत. पंतचे माजी प्रशिक्षक अवतार सिंग यांनी देखील पंतसाठी प्रार्थन केल्या आहेत.
“माझे आयुष्य देखील पंतला मिळावे,” अशी प्रतिक्रिया रिषभ पंत (Rishabh Pant) याचे प्रशिक्षक अवतार सिंग (Avtar Singh) यांनी दिली. अवतार सिंग आजही रुरकीमध्ये त्यांची वीर शौर्य क्रिकेट अकादमी चालवतात. त्यांनी पंतला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात क्रिकेटचे महत्वाचे धडे दिले, ज्याचा फायदा या यष्टीरक्षक फलंदाजाला आजही होत आहे. शुक्रवारी पहाटे 6 वाजता अवतार यांना पंतच्या अपघातीच माहिती देण्यासाठी फोन आला होता. त्यांच्या अकादमीतील एका खेळाडूने ही माहिती त्यांना दिली होती. ही बातमी समजल्यानंतर अवतार सिंग यांना विश्वास बसला नाही. पण काहीच मिनिटांनंतर दुसरा फोन देखील आला आणि नंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपतार सिंगांना एका पोलीस अधिकाऱ्याने देखील फोन करून पंतच्या अपघाताची माहिती दिली होती.
अपघातानंतर उपस्थितांनी पंतच्या मदतीसाठी धाव घेतली आणि पोलीस देखील काही मिनिटांमध्ये त्याठिकाणी पोहोचले. पंतला प्राथमिक उपचारासाठी सक्षम रुग्णालयात दाखल केले गेले. अपतार सिंग या रुग्णालयात पंतला पाहायला पोहोचले आणि त्यांनी डॉक्टर्ससोबत चर्चा देखील केली. डॉक्टरांकडून पंतच्या तब्येतीविषयी माहिती घेतल्यानंतर सिंग घरी परतले. पंत सध्या डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल केले गेले.
“त्याच्याकडे तीन-तीन ड्रायव्हर आहेत. त्याला घरी किंवा इतर कुठे जायचे होते, तर त्याने ड्रायव्हरला सोबत नेले पाहिजे होते. हा त्याचा निष्काळजीपणा होता. आता जे झाले ते आपण बदलू शकत नाही. फक्त इश्वराकडे प्रार्थना करू शकतो की, पंत लवकरात लवकर बरा व्हावा. माझे आयुष्य त्याला मिळो आणि भारतीय संघात त्याने पुन्हा जागा मिळवावी. सर्वांचीच अशी इच्छा आहे,” असेह अवतार सिंग पुढे बोलताना म्हणाले. (Rishabh Pant left alone with three drivers at home, says Avtar Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरांच्या चुकीने खेळाडूची कारकीर्द लागली पणाला! चुकवली महत्त्वाची शस्त्रक्रिया?
श्रीलंकेची डोकेदुखी वाढवणार ‘हे’ दोन गोलंदाज, प्रदर्शनाच्या बाबतीत बुमराह-शमीलाही टाकतील मागे