आज (14 जानेवारी) वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), मुंबई (Mumbai) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (First Match) पार पडत आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या हेल्मेटला चेंडू लागून तो जखमी (Injured) झाला आहे.
भारताकडून फलंदाजी करताना पंतच्या डोक्याला चेंडू लागून तो जखमी झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आली असताना केएल राहुलने यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी स्विकारली.
“रिषभ पंत फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होते,” असे पंतच्या दुखापतीवर बीसीसीआयने माहिती दिली.
Update: Rishabh Pant has got a concussion after being hit on his helmet while batting. KL Rahul is keeping wickets in his absence. Pant is under observation at the moment. #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/JkVElMacQc
— BCCI (@BCCI) January 14, 2020
पंतचा बदली खेळाडू म्हणून मनीष पांडेला क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. त्यामध्ये पंतने 33 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 28 धावांचे योगदान दिले.
टीम पेनच्या त्या आव्हानाला विराटचे प्रत्युत्तर; म्हणाला
वाचा- ????https://t.co/82YKV8JEVv????#म #मराठी #Cricket @tdpaine36 @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 14, 2020
दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूचा क्रिकेटला अलविदा…
वाचा???? https://t.co/QESgKel82j????#म #मराठी #Cricket @jpduminy21— Maha Sports (@Maha_Sports) January 14, 2020