भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवून देण्यात रिषभ पंतने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने अनेकदा भारतीय संघाला एकहाती झुंज देत सामने जिंकून दिले आहेत. चला तर पाहूया रिषभ पंतच्या काही खेळी, ज्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे.
१) ७८ धावा विरुद्ध इंग्लंड, (पुणे वनडे २०२१)
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली होती. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात जेव्हा रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी आला होता; तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ११७ धावा अशी होती. रिषभने या सामन्यात ६२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने ७८ धावा केल्या होत्या. याच खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३२९ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला ५० षटक अखेर ९ बाद ३२२ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ७ धावांनी आपल्या नावावर केला होता.
२) १०१ धावा विरुद्ध इंग्लंड, (अहमदाबाद कसोटी २०२१)
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत रिषभ पंतने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने अनेकदा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढायचे काम केले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करायला आलेल्या भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघ ६ विकेट्स १४६ धावा अशा स्थितीत असताना रिषभ पंतने संयमाने खेळत वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून ११३ धावांची भागीदारी केली होती. यामध्ये रिषभ पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकार लगावत १०१ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि २५ धावांनी आपल्या नावावर केला होता.
३) नाबाद ८९ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गाब्बा कसोटी २०२१)
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला २-१ ने पराभवाची धूळ चारली होती. मालिकेचा शेवटचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिसबेनच्या गाब्बा येथे खेळला गेला. या सामन्यापुर्वी दोन्हीही संघ १-१ ने बरोबरीत होते. शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ३३८ धावांची आवश्यकता होती. कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी इतके मोठे आव्हान पूर्ण करणे कठीण असते. भारतीय संघाच्या धावा १६७ वर ३ गडी बाद असताना, रिषभ पंत फलंदाजी करायला आला होता.
पंतने येताच आक्रमण न करता हळूहळू डाव पुढे नेला. त्यानंतर त्याने मोठी भागीदारी करत आव्हान गाठले. त्याने १३८ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने ही कसोटी मलिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
जमतंय की! ‘मिसेस बुमराह’च्या सुपरकूल डान्सने जिंकली चाहत्यांची मने, बघा भारी व्हिडिओ
आयपीएल स्थगितीमुळे नाराज लोक थेट ‘इंडियन आयडॉल’ शोवर काढतायेत राग; होस्ट आदित्यचा खुलासा