मुंबई उपनगर जिल्ह्याचे २०१८-१९ चे जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ आज २६ जानेवारी रोजी संपन्न झाला. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्याचे योगदनाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागमार्फत दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार दिले जातात.
मुंबई उपनगर जिल्हाचा गुणवंत खेळाडु म्हणून रिशांक देवाडीगा थेट पुरस्कार देण्यात आला. रिशांक देवडीगाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कबड्डी संघाने ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले हिते. सदर जिल्हा पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये १०,०००/- प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गुणवंत पुरुष खेळाडु म्हणून दीपक वामन शिंदे (मल्लखांब), गुणवंत महिला खेळाडु म्हणून ऋतुजा प्रमोद वाघ(जिमस्टिक) तर गुणवंत दिव्यांग खेळाडु सिंह जयदीप ह्रदय (ज्यूदो), सुनील तातू रणदिवे (जिमस्टिक) यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, सिंह त्रिभुवन जोगेंद्र यांना गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सदर पुरस्काराचे वितरण मा. श्री. आदित्य उद्धव ठाकरे, मंत्री, पर्यटन, पर्यावरण, राज्यशिष्टाचार महाराष्ट्र राज्य, तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री यांच्या शुभहस्ते तसेच श्री मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या उपस्थितीत आज दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी प्रदान करण्यात आले