भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातग्रस्त झाल्यामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. रिषभ पंतचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी देखील पंतच्या अपघातानंतर सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. या सगळ्यात पंतचे काही व्हिडिओ आणि फोटो मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी काढले होते. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेह हिने हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे रुरकी म्हणजेच त्याच्या घरी चालला होता. आई आणि बहिणीला सरप्राईज देण्यासाठी तो शुक्रवारी पहाटे एकटाच मर्सिडीज गाडीतून एकटाच रुरकीला निघाला. पण वाटेत त्याचा अपघात झाला. अपघातात त्याची गाडी जळून खाक झाली, पण सुदैवाने गाडीने पेट घेण्याआधीच पंत त्यातून बाहेर पडला होता. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पंतला पेटलेल्या गाडीपासून लांबन नेले आणि त्याला आवश्यक ती मदत देखील केली. याच प्रसंगी पंतचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढले गेले, जे सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फिरत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) याची पत्नी रितिका रजदेह (Ritika Sajdeh ) हिने मात्र पंतसोबत नेटकऱ्यांकडून होणाऱ्या या चुकीच्या वर्तनावर आवज उठवला गेला आहे. रितिकाच्या मते पंतेचे जखमी अवस्थेतील व्हिडिओ आणि फोटो शेअर करणे अगदी चुकीचे आहे, कारण तो त्यावेळी पुरेशा शुद्धीत देखील नव्हता.
रितिक सजदेहने तिच्या अधिकृत इंस्टाग्रान खात्यावरून स्टोरी शेअर करत लिहिले की, “एका जखमी व्यक्तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. हा व्यक्त त्याला हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचे आहेत की नाही, हा निर्णय देखील घेऊ शकत नसताना हा प्रकार घडत आहे. त्याचे कुटंब आहे, मित्र आहेत, ज्यांना हे फोटो पाहून वाईट वाटत असेल. एक पत्रकार असतात आणि दुसरे असतात त्यांच्यात कुठल्याच भावना उरलेल्या नाहीत.”
दरम्यान, भारतीय संघाला जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वनेड मालिका खेळायची आहे. या मालिकेत निवडकर्त्यांनी पंतला विश्रांती दिली होती. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मात्र पंतवर मोठी जबाबदारी होती. ऑस्ट्रेलियन कसोटी संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेत पंत मॅच विनरची भूमिका पार पाडू शकत होता, जे त्याने यापूर्वी देखील केले आहे. पण अपघातानंतर पंतला आता पुढचा एक वर्षांचा काळ मैदानाबाहेर राहावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Ritika Sajdeh is furious with those who shared the video of Rishabh Pant injured)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माणूस व्हा रे! रिषभच्या अपघातानंतर कार्तिकची लोकांना कळकळीची विनंती; म्हणाला…
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात