क्रिकेटटॉप बातम्या

सासऱ्यांविषयी प्रश्न विचारल्यावर रागाने लाल झाली रिवाबा! पाहा भाजप आमदार नक्की काय म्हणाल्या

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजा मागच्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नेहमी क्रिकेटच्या मैदानातील प्रदर्शनामुळे बातम्यांमध्ये असणारा जडेजा, यावेळी मात्र आपल्या वडिलांच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. जडेजाच्या वडील अनिरुद्ध सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबावर गंभीर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर रवाबाला देखील एका कार्यक्रमात सासऱ्यांविषयी प्रश्न विचारला गेला. यावर रिवाबाचे उत्तर सध्या व्हायरल होत आहे.

रविंद्र डडेजा (Ravindra Jadeja) आणि रिवाबा (Rivaba Jadeja) यांनी 2016 मध्ये लग्न केले. मागच्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी भारतीय जनता पक्षाकडून जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार देखील झाली. जडेजा आणि रिवाबा यांचा संसार सुखात चालल्याचे चित्र मागच्या वर्षभरापासून माध्यमांमध्ये दाकवले जात होत. पण जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देत मुलगा रविंद्र आणि सून रिवाबाला खडेबोल सुनावले आहेत. अनिरुद्ध यांच्या मते लग्न झाल्यानंतर मुलगा आणि सून यांच्याशी त्यांचे सतत वाद होते होते. याच कारणास्तव आता ते मुलासोबत न राहता वेगळे राहतात. तसेच स्टार क्रिकेटपटू असेलल्या मुलाकडून एक रुपयाचीही मदत घेत नाहीत.

हा वाद गरम असतानाच रिवाबा एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. यावेळी एका पत्रकाराला रिवाबाला तिचे साररे अनिरुद्ध जडेजा यांच्याविषयी प्रश्न विचारला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिवाबा यात गुजरातीमध्ये बोलते की, “आज आपण इथे (सार्वजनिक कार्यक्रम) आहोत. तुम्हाला याविषयी (सारऱ्यांसोबतचा वाद) जाणून घ्यायचे आहे, तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता.”

दरम्यान, अनिरुद्ध यांची मुलाखत समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू जडेजानेही यावर स्पष्टीकरण दिले होते. जडेजाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या मुलाखतीवर विस्वास ठेवू नका, असे सांगितले होते. जडेजाच्या मते त्याची आणि रिवाबाची प्रतिमा खराब करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसऱ्यासामन्यात दुखापतीच्या कारणास्तव रविंद्र जडेजा खेळला नव्हता. पण शनिवारी (10 फेब्रुवारी) मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ समोर आला. या संघात जडेजाचे पुनरागमन झाले आहे. अशात 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात जडेजा खेळताना दिसू शकते. (Rivaba Jadeja got angry after being questioned about father in law)

महत्वाच्या बातम्या –
U19 WC Final । टीम इंडियाचा घाम काढणाऱ्या हरजस सिंगचे कुटुंब भारतात राहतं? खेळाडूने स्वतःच सांगितलं
पंचांच्या निर्णयाने ऑस्ट्रेलियन संघ हैराण! पाहा फलंदाज धावबाद असून का नाही दिले आऊट?

Related Articles