आसामचा युवा अष्टपैलू रियान पराग देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने आसाम संघाला एकहाती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते. फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात. लवकरच त्याचा भारताच्या टी20 संघात समावेश होऊ शकतो.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 स्पर्धेत रियान याने आसाम संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. उपांत्य फेरीपर्यंत संघाला पोहोचवलेल्या हरियाणा याने 10 सामने खेळताना 85 च्या सरासरीने सर्वाधिक 510 धावा केल्या. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश होता. यासोबतच त्याने स्पर्धेत 11 बळी देखील मिळवले. स्पर्धेच्या इतिहासात 500 धावा आणि 10 पेक्षा जास्त बळी मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला.
त्याच्या याच कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला विश्वचषकानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट केले जाऊ शकते.
या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण, प्रमुख भारतीय खेळाडू विश्वचषकात खेळले असल्याने त्यांना विश्रांती देण्यात येईल.
रियान मागील चार वर्षांपासून सातत्याने आयपीएल मध्ये व देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. आयपीएलमधील त्याच्या खराब कामगिरीमुळे अनेक वेळा त्याच्यावर टीका होत असते. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. भारतासाठी 2018 अंडर 19 विश्वचषक जिंकलेला रियान भारतीय संघासाठी खेळल्यास भारतीय जर्सी परिधान करणारा तो पहिला आसामचा खेळाडू ठरेल.
(Riyan Parag is likely to get his maiden India call in the Australia T20I series)
महत्वाच्या बातम्या –
“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर