इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (21 जुलै) पार पडला. आर प्रेमदासा स्टेडिअम, कोलंबो येथील सामन्यात भारत अ विरुद्ध बांगलादेश अ संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले. उपांत्य सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी बांगलादेश अ संघाला 51 धावांनी पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाले. त्याचवेळी भारतीय संघाचा अष्टपैलू रियान पराग याने पकडलेला एक झेल देखील चर्चेचा विषय बनला.
How about that for a catch from Riyan Parag 💥pic.twitter.com/QGvvbIcGCC
— 🅒🅡🅘︎🅒︎🄲🅁🄰🅉🅈𝗠𝗥𝗜𝗚𝗨™ 🇮🇳❤️ (@MSDianMrigu) July 22, 2023
या सामन्यात बांगलादेश अ संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात 10 विकेट्स गमावत 211 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर सामना भारताच्या हातातून निसटताना दिसला. मात्र, ज्यावेळी भारतीय फिरकीपटू निशांत सिंधू याने आपल्या जाळ्यात बांगलादेशच्या फलंदाजांना फसवले. त्यामुळे एक वेळ बिनबाद 70 अशा परिस्थितीत असलेल्या बांगलादेशचा डाव सर्वबाद 160 असा मर्यादित राहिला.
बांगलादेश संघ फलंदाजी करत असताना त्यांचा आठव्या क्रमांकाचा फलंदाज रकीबुल हसन याला बाद करताना रियान पराग याने जबरदस्त चपलाळी दाखवली. निशांत गोलंदाजी करत असताना हसन याने रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या फटक्याचा अंदाज येताच स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रियानने तो फटका खेळण्याआधीच काही पावले डावीकडे हालचाल केली. त्यामुळे त्याने मारलेला फटका थेट त्याच्या हातात गेला. त्याच्या या समयसुचकतेचे अनेकांनी कौतुक केले.
या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघ आता अंतिम सामन्यात रविवारी पाकिस्तानशी दोन हात करेल.
(Riyan Parag Show Presence Of Mind And Took Sharp Catch Against Bangladesh A In Emerging Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
माजी दिग्गजाचा मोठा दावा! सीएसकेचा पुढचा कर्णधार असेल युवा ‘हा’ खेळाडू
BREAKING: श्रीलंकेच्या विश्वविजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपआधी घेतला धक्कादायक निर्णय