---Advertisement---

टी20 वर्ल्डकप 2024 साठी उथप्पा ‘या’ खेळाडूला पाहतोय फिनिशर म्हणून, कारण देत म्हणाला…

Robin uthappa
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने संजू सॅमसनला भारतीय संघात नियमित संधी देण्याची मागणी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 12 धावा करून संजू सॅमसन धावबाद झाला. उथप्पाने संजू सॅमसनचे वर्णन फिनिशरच्या भूमिकेत केले आहे. सॅमसन गेल्या काही वर्षांपासून जागतिक क्रिकेटमधील सर्वात चर्चित खेळाडू आहे.

संजू सॅमसन (Sanju Samson) हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र, त्याला भारतीय संघाने जास्त संधी दिली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव झाला. सॅमसन या सामन्यात 12 धावा करुन दुर्दैवाने धावबाद झाला. अशातच 2024 टी20 विश्वचषक जवळ आला आहे आणि भारतीय संघ आधीच टी20 विश्वचषकच्या तयारीला लागली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघात अनेक युवा फलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यावर उथप्पाने आपले मत मांडले आहे.

भारतीय संघासाच्या फिनिशरच्या भूमिकेसाठी रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) आपले मत मांडत संजू सॅमसनला महत्व दिले आहे. जिओ सिनेमाशी बोलताना उथप्पा म्हणाला, “मला आशा आहे की भारतीय संघ व्यवस्थापन संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 6 व्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याला मोठी भूमिका मिळणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला संजू सॅमसनला टी20 विश्वचषकात खेळवायचे असेल तर, फिनिशरची भूमिका निभावण्यासाठी तो योग्य पर्याय आहे. त्याला 6 या क्रमांकावर खेळवण्यासाठी त्याला या क्रमांकावर सतत संधी द्यावी लागेल.”

भारताचा पराभव
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसन 12 धावांवर धावबाद झाला. विंडीजच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 145 धावाच करता आल्या. त्यामुळे यजमान वेस्ट इंडिज संघाने हा सामना 4 धावांच्या नजीकच्या फरकाने जिंकला. यासोबतच त्यांनी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. (robin uthappa support sanju samson for t20 world cup in 2024)

महत्वाच्या बातम्या:
टीम इंडियाच्या प्लॅनवर चहलने फेरलं पाणी! 10व्या क्रमांकावर मैदानात येऊन परत गेला बाहेर, व्हिडिओ व्हायरल
BREAKING: विश्वविजेत्या इंग्लिश क्रिकेटपटूची तडकाफडकी निवृत्ती, वादळी कारकिर्दीला दिला अकाली विराम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---