Loading...

आयडीबीय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई अर्ध मॅरेथॉन 2019: रॉबिन, वर्षा यांची स्पर्धेत चमक

मुंबई। दिल्लीच्या रॉबिन सिंगने जेतेपदाच्या हॅटट्रीकच्या प्रयत्नात असलेल्या ज्ञानेश्‍वर मोरगाला मागे टाकत आयडीबीय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई अर्ध मॅरेथॉन 2019 स्पर्धेत जेतेपद मिळवले. रॉबिनने ज्ञानेश्‍वरपेक्षा 21 किमी स्पर्धेत दोन मिनिटे चांगला वेळ नोंदवत 1:11:43 सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. मुंबईच्या वर्षा नामदेव भवारीने महिला गटात 1:33:38 सेकंद वेळेसह चमक दाखवली. स्पर्धा बीकेसीच्या जिओ गार्डन्स येथून सुरुवात झाली.

18 हजारहून अधिक धावपटूंनी तीन वेगवेगळ्या गटात सहभाग नोंदवला होता.सकाळी पाऊस होऊन देखील धावपटूंमधील उत्साह कमी झाला नव्हता. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर सचिन तेंडुलकरने मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला व विजेत्यांना पुरस्कार देखील दिला. यावेळी अनेक युवा धावपटूंनी क्रिकेटच्या या दिग्गज खेळाडूसोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

रॉबिनने सुरुवातीपासूनच चमक दाखवली. गतविजेता असलेल्या ज्ञानेश्‍वर बराच वेळ रॉबिनपासून पिछाडीवर होता. त्यामुळे त्याने 1:13:44 सेकंद वेळेसह दुसरे स्थान मिळवले. ज्ञानेश्‍वरला गेल्या वर्षीचा उपविजेता पर्शराम भोईने चांगले आव्हान दिले व अवघा एका सेकंदामध्ये तो तिस-या स्थानी आला.

Loading...

महिला गटात वर्षाला गेल्या वर्षीची उपविजेती सायली कुपते चांगले आव्हान दिले. या दोघीजणी जवळपास 15 किमी एकत्रच धावत होत्या.पण, वर्षाने आपली गती वाढवत सायली मागे टाकले. नयन बाळासाहेब किरडकने 1:38:24 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

10 किमी टाईम रनमध्ये पुरुषांच्या गटात रोहित यादवने 32:38 सेकंद वेळेसह अव्वल स्थान मिळवले.तर, कमल कुमार (33:10 सेकंद) आणि आरिफ अली (33.17 सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. महिला गटात रिशु सिंगने 39:57 सेकंद वेळेसह अव्वल स्थान मिळवले. सायली कोकीटकरने (40:45 सेकंद) दुसरे तर, शिल्पी यादव (42:51) तिसरे स्थान मिळवले.

You might also like
Loading...