भारतात मागील दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये काही सुट देण्या आल्या आहेत. यात खेळाडूंना वैयक्तिक सरावासाठीही परवानगी दिली आहे.
परंतू आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांना रिकाम्या मैदानात म्हणजेच प्रेक्षकांविना सराव करण्यास सांगण्यात आले आहे.
पण तरीही महाराष्ट्र शासनाने मुंबई-पुणे सारख्या रेड झोनमधील क्षेत्रात सरावासाठी अजून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सध्या सर्वाधिक कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या मुंबई शहरात रहात असलेल्या रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना अजूनही बाहेर जाऊन सरावाची परवानगी नाही.
याबद्दल ला लीगाच्या फेसबुक पेजवर बोलताना रोहितने म्हटले आहे की भारतीय संघातील खेळाडू सरावाला सुरुवात करतील तेव्हा त्यांच्यात तो सर्वात शेवटी सामील होऊ शकतो.
रोहितला जेव्हा विचारण्यात आले की जेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती संपेल तेव्हा तूला कोणाला पहिल्यांदा भेटायला आवडेल? संघात जोकर कोण आहे?
त्यावर रोहित म्हणाला, ‘संघात अनेकजण जोकर आहेत. भारतात काही ठिकांणांना मोठा फटका बसला आहे तर काही ठिकाणांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.’
भारताचा सलामीवीर फलंदाज पुढे म्हणाला, ‘मला वाटते मी जिथे राहतो ते मुंबई शहर सर्वाधिक संसर्गित आहे, त्यामुळे कदाचीत मुंबईपेक्षा अन्य ठिकाणे लवकर चालू होतील. मला वाटते की अन्य सर्वजण मला ते माझ्याआधी एकमेकांना भेटल्याचे व्हिडिओ पाठवतील.’
सध्या भारताच्या शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी स्थानिक मैदानात सरावास सुरुवात केली आहे. शार्दुलने पालघरमध्ये तर वॉशिंग्टनने चेन्नईमध्ये सरावास सुरुवात केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
ये दोसती हम नही तोड़ेंगे! १९ जेमिमाह हे खास आहे तिच्या संघसहाकाऱ्यांसाठी
किंग्ज ११ पंजाब सोडून दिल्ली संघात जाण्याचे कारण अखेर अश्विनने सांगितलेच
शार्दुल ठाकूरनंतर आता टीम इंडियाच्या या खेळाडूनेही केली सरावास सुरुवात