Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! ‘हिटमॅन’चं ‘ते’ ट्वीट व्हायरल

सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! 'हिटमॅन'चं 'ते' ट्वीट व्हायरल

November 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-And-Suryakumar-Yadav

Photo Courtesy: Instagram/surya_14kumar


भारतीय संघाने दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाचा दारुण पराभव केला. भारताने न्यूझीलंड संघाला 65 धावांनी धूळ चारत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने शतक झळकावत गोलंदाजांचा घाम काढला. त्याने माऊंट माँगनुई येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावांची वादळी खेळी केली. या खेळीसोबतच सूर्यकुमार एका कॅलेंडर वर्षात दोन शतके झळकावणारा भारताचा दुसरा फलंदाज बनला. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा याने अशी कामगिरी 2018मध्ये करून दाखवली होती. अशात रोहित शर्माचे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. हे ट्वीट सूर्यकुमारशी संबंधित होते.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मार्च 2021मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने खूपच कमी काळात तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील भारत आणि जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. न्यूझीलंडपूर्वी सूर्याने टी20मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.

न्यूझीलंड संघाविरुद्ध शतकी खेळी करताना सूर्याने 7 षटकार आणि 11 चौकारांची बरसात केली. या धावा करण्यासाठी त्याने 49 चेंडूंचा सामना केला. आपल्या वेगवेगळ्या फटकेबाजीने सूर्याने टीम साऊदी, ऍडम मिल्ने आआणि लॉकी फर्ग्युसनसोबतच न्यूझीलंडच्या सर्व वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, त्याच्या या फटकेबाजीनंतर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे 11 वर्षांपूर्वीचे ट्वीट व्हायरल होत आहे.

रोहितचे ट्वीट
या ट्वीटमध्ये रोहितने सूर्यकुमारचा उल्लेख केला होता. त्याने लिहिले होते की, “चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कार सोहळा समाप्त झाला. भविष्यात काही रंजक क्रिकेटपटू येणार आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादव भविष्यात दिसणारा खेळाडू असेल.” रोहितचे हे ट्वीट भलतेच व्हायरल झाले. आता चाहते हे ट्वीट रिट्वीट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच, या ट्वीटवर कमेंट्सही करत आहेत.

एका युजरने लिहिले की, “रोहितला माहिती होते.” तसेच, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “दूरदृष्टी असणारा रोहित शर्मा.” आणखी एका युजरने लिहिले की, “भविष्य सांगणारा हिटमॅन.” एकाने असेही लिहिले की, “आता सूर्यकुमार जगभरातील क्रिकेटवर राज करत आहे. सूर्यकुमारवर विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद कर्णधार.”

Now he rolling the world cricket.. thankyou captain for backing him🙏🏻#RohitSharma #SuryakumarYadav 💖💯 https://t.co/toiXsBqMAM

— ΝΘᏴᏆͲᎪ🇮🇳🚩❣️💯 (@NTH82873844) November 20, 2022

Once upon a time HITMAN say about SURYA ❤️ https://t.co/uePGiRNTBt

— VIRATIAN (@cricVed) November 20, 2022

“Visionary Sharma” 🥵🥵 https://t.co/cTPL2Zy7oD

— Hemantkashyap (@Hemantkashyappp) November 20, 2022

He knew it. https://t.co/4dgVSvHMMu

— Anuj Nitin Prabhu 🏏 (@APTalksCricket) November 20, 2022

Just got done with BCCI awards here in chennai..some exciting cricketers coming up..Suryakumar yadav from Mumbai to watch out for in future!

— Rohit Sharma (@ImRo45) December 10, 2011

सूर्यकुमार हा नवीन ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तो मैदानावर कोणत्याही कोपऱ्यात षटकार लावण्यात पटाईत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सूर्याने कव्हर्स आणि फाईन लेगवर काही जबरदस्त षटकार लावले. तो यावर्षी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाजही ठरला आहे. यावर्षी सूर्याने 30 टी20 सामने खेळले. यामद्ये त्याने 1151 धावा चोपल्या. यावर्षी त्याच्या नावावर सर्वाधिक 67 षटकारांचा समावेश आहे. (rohit sharma 11 year old tweet on suryakumar yadav century viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहता येईल भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना? येथे घ्या जाणून
‘मी गुन्हेगार नाहीये…’, चेंडूशी छेडछाड प्रकरणात अडकलेल्या दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य


Next Post
Umran Malik and sanju samson

आयपीएल गाजवणारे उमरान मलिक आणि संजू सॅमसन खेळणार का तिसरा टी20 सामना? हार्दिकने दिले स्पष्टीकरण

Iran Football Team

VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर

Umran-Malik-Hardik-Pandya

न्यूझीलंडविरुद्ध 'बर्थ-डे बॉय' उमरानला मिळणार का संधी? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143