चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी(१३ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडिन्सने १० धावांनी बाजी मारली. या सामन्यात खेळताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही एक खास विक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई संघाकडून रोहित शर्माने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारले. त्याचे अर्धशतक केवळ ७ धावांनी हुकले, असे असले तरी त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.
रोहितच्या आता आयपीएलमध्ये २०२ आयपीएल सामन्यात ३१.३१ च्या सरासरीने २२९२ धावा झाल्या आहेत. या धावांसह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
आयपीएलमध्ये मंगळवारपर्यंत धवनने १७६ डावांमध्ये ५२८२ धावा केलेल्या आहेत आणि वॉर्नरने १४२ डावांमध्ये ५२५७ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता धवन सर्वाधिक आयपीएल धावा करणाऱ्यांमध्ये चौथ्या आणि वॉर्नर पाचव्या क्रमाकंवार आहे. तसेच या यादीत ५९११ धावांसह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा सुरेश रैना ५४२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईने जिंकला सामना
या सामन्या मुंबईने रोहितच्या ४३ आणि सूर्यकुमार यादवने केलेल्या ३६ चेंडूतील सर्वाधिक ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत सर्वबाद १५२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल कोलकाताला मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या टीच्चून माऱ्यासमोर २० षटकांत ७ बाद १४२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना १० धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सने केलेल्या ‘त्या’ ट्विटने जिंकले मराठी चाहत्यांचे मन; पाहा असं काय लिहिलं होतं
दे घुमा के! सुर्यकुमारचा ९९ मीटरला हेलिकॉप्टर षटकार पाहून हार्दिक पंड्याही झाला थक्क, पाहा व्हिडिओ
केकेआरविरुद्ध विजय मिळवला पण तब्बल २२५ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सवर ओढवली ‘ही’ नामुष्की