भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी ९८ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत, तरीही त्यांना सोबत फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. त्यांनी आतापर्यंत ४ कसोटी, ५५ वनडे आणि ३९ टी२० असे मिळून एकूण ९८ सामने एकत्र खेळले आहेत. Rohit Sharma And Jasprit Bumrah Played 98 international Matches But Can’t Bat Together
कोरोना व्हायरसमुळे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट क्षेत्र पूर्णपणे ठप्प पडले आहे. पुढे परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर जेव्हा क्रिकेटची सुरुवात होईल तेव्हा रोहित-बुमराह या जोडीचे नाव त्या जोडींमध्ये सामाविष्ट होईल. ज्यांनी १००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. परंतु, त्यांना एकदाही सोबत फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
रोहित २०१३पासून भारतीय संघातील नियमित सलामीवीर फलंदाजाची भूमिका बजावत आहे. तर, बुमराहने २०१६मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुुरुवात केली होती. बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या १२७ आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ४२ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. त्यातही ३४ डावांमध्ये त्याने ११व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
रोहित आणि बुमराह ज्या ९८ सामन्यांमध्ये संघाचा भाग होते, त्या सामन्यात एकूण १०१ डाव खेळण्यात आले. त्यापैकी केवळ २३ डावात बुमराहने फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे, अधिकाधिक वेळेला मोठ्या धावांची खेळी करत मैदानावर जास्त वेळ टिकून राहणारा रोहित, या २३ डावांमध्ये मात्र विशेष खेळी करु शकला नाही. रोहितने २३ डावांपैकी ५ डावात केवळ १ शतक आणि २ अर्धशतके केली. तर, उर्वरित १८ डावात तो १५पेक्षा जास्त धावा करु शकला नाही.
यावरुन स्पष्ट कळून येते की, रोहित आणि बुमराहचा एकत्र फलंदाजी करण्याचा योग आतापर्यंत एकदाही आला नाही.
शिवाय, भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यासोबतही रोहितने आतापर्यंत एकदाही फलंदाजी केलेली नाही. दोघांनी आतापर्यंत ४७ वनडे आणि ३३ टी२० असे मिळून ८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु, त्यांनी सोबत एकदाही फलंदाजी केलेली नाही.
तसं पाहिलं तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने एकत्र खेळूनही सोबत फलंदाजी करण्याची संधी न मिळण्याचा विक्रम हा श्रीलंकाच्या सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्यांनी ४०८ आंतरराष्ट्रीय सामने (९० कसोटी, ३०७ वनडे आणि ११ टी२०) एकत्र खेळले आहेत. पण, एकदाही सोबत फलंदाजी केलेली नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
ठरलं तर! या तारखेला होणार टी२० विश्वचषकाचा अंतिम निर्णय
‘या’ संघाने केले होते विराटचे कारकिर्दीतील…
क्रिकेटमध्ये असा ‘बाप’ योगायोग ना कधी पुन्हा…