भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना राजकोट येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाने ही मालिका आपल्या नावे केली. सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी ही ट्रॉफी या सामन्यात केवळ क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघासोबत जोडलेल्या सौराष्ट्राच्या खेळाडूंना दिली.
राजकोट येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 353 धावांचे आव्हान झेपले नाही. कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी अर्धशतके केली मात्र इतर फलंदाजांची त्यांना तितकी साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. परंतु भारतीय संघाने मालिकेतील आधीचे दोन सामने जिंकले होते. त्यामुळे ही मालिका भारतीय संघाने आपल्या नावे केली.
Several players went home for a break, few players were ill then the Indian team invited Saurashtra players as subs and it is nice to see they were in between the senior Indian players and raising the series-winning Trophy. pic.twitter.com/fTeaUeXwkd
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2023
मालिका विजयाची ट्रॉफी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या दोन सामन्यात नेतृत्व केलेल्या केएल राहुल याच्याकडे सोपवली. त्यानंतर राहुलने ही ट्रॉफी केवळ या सामन्यासाठी भारतीय संघासोबत जोडल्या गेलेल्या युवा क्रिकेटपटूंकडे दिली. या सामन्यासाठी भारतीय संघाकडे केवळ बाराच खेळाडू उपलब्ध होते. त्यात केवळ रविचंद्रन अश्विन हा बाकावर बसला.
त्यामुळे या सामन्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे हार्दिक देसाई, प्रेरक मंकड, धर्मेंद्र जडेजा व विश्वराज जडेजा यांना भारतीय संघात ड्रिंक्स देण्यासाठी तसेच क्षेत्ररक्षणासाठी सामील केले गेलेले. त्यामुळे भारतीय संघाने विजयाची ट्रॉफी त्यांच्याकडे सुपूर्द केली. संघ व्यवस्थापनाची ही कृती सर्वांना आवडली व त्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात राहुल याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मोहाली व इंदौर येथे झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवलेला. त्यामुळे रोहितने मालिका विजयाचा मान देखील राहुललाच देण्याचा निर्णय घेतला.
(Rohit Sharma And KL Rahul Handed Trophy To Saurashtra Youngsters After Win Over Australia)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी