fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१८ ला वेस्ट इंडिजविरुद्ध लखनऊला झालेल्या टी२०सामन्यात ६१ चेंडूत नाबाद १११ धावा करत रोहितचे आंतरराष्ट्रीय टी२० मधील चौथे झळकावले.

या शतकामुळे रोहितचे आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते पुन्हा सर्वांसमोर आले होते. कारण रोहितसाठी नोव्हेंबर महिना अनेक गोष्टींसाठी खास आहे.

असे आहे रोहित आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते:

वनडेतील द्विशतके- रोहितने वनडे क्रिकेटमध्ये एकूण तीन द्विशतके केली आहेत. यातील दोन द्विशतके त्याने नोव्हेंबर महिन्यात केली आहेत. तसेच त्याने त्याचे वनडेतील पहिले द्विशतकही नोव्हेंबर महिन्यातच केले होते.

त्याने २ नोव्हेंबर २०१३ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर एक वर्षांनी १३ नोव्हेंबर २०१४ ला वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारताना २६४ धावांची तूफानी खेळी केली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण आणि पहिली ३ कसोटी शतके –

रोहितने ६ नोव्हेंबर २०१३ मध्ये विंडीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १०८ वनडे सामने खेळल्यानंतर ७ वर्षांनी रोहित शर्माला क्रिकेटचा हा प्रकार खेळण्याची संधी मिळाली होती.

या सामन्यात रोहितने पहिल्या डावात ३०१ चेंडूत १७७ धावांची धमाकेदार खेळी करत कसोटीतील पहिले शतक केले होते. त्यानंतर पुढच्याच सामन्यातही रोहितने १११ धावांची खेळी करत सलग दुसरे कसोटी शतक केले.

तसेच त्यानंतर रोहितने २६ नोव्हेंबर २०१७ ला श्रीलंके विरुद्ध कसोटीतील तिसरे शतक केले. हे शतक त्याने करताना त्याने नाबाद १०२ धावांची खेळी केली होती.

ही रोहितची कसोटी कारकिर्दीतील पहिली ३ शतके होती. ही पहिली तीन्ही शतके त्याने नोव्हेंबर महिन्यात केली आहेत.

चौथे आंतरराष्ट्रीय टी२० शतक: रोहितने ६ नोव्हेंबर २०१८ आंतरराष्ट्रीय टी२० मधील चौथे शतक केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चार शतके करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला. अजूनही कोणाला आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४ शतके करता आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल

गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद

 

You might also like