भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिका नुकतीच संपली. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. यानंतर बुधवारी(१० मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचे क्रिकेटपटू रिषभ पंत, आर अश्विन यांनी मोठी प्रगती केली आहे.
फलंदाजांच्या यादीत रिषभ पंतने कारकिर्दीतील सर्वोत्तम ७ वे स्थान मिळवले आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत १०१ धावांनी महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे त्याला क्रमवारीत गरुड झेप घेण्यात यश आले आहे. त्याने ७ स्थानांची झेप घेत ७ वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे आता तो ७ व्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि हेन्री निकोल्स यांच्यासह संयुक्तपणे विराजमान आहे. रोहितनेही एक स्थानाची प्रगती करत ७ वे स्थान मिळवले आहे.
याशिवाय पहिल्या ५ क्रमांकावर अनुक्रमे केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, जो रुट आणि विराट कोहली कायम आहेत. विराटचे सध्या ८१४ गुण असून तो इतक्या कमी गुणांवर नोव्हेंबर २०१७ नंतर पहिल्यांदाच घसरला आहे.
तसेच इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत नाबाद ९६ धावा करणारा वॉशिंग्टन सुंदरनेही फलंदाजी क्रमवारीत ३९ स्थानांची झेप घेत ६२ वे स्थान मिळवले आहे.
त्याचबरोबर इंग्लंडच्या डॅन लॉरेन्सने ४७ स्थानांची झेप घेत ९३ वे स्थान मिळवले आहे. त्याने भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत ४६ आणि ५० धावा केल्या होत्या.
Rohit Sharma and Rishabh Pant are both at No.7 in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting ????
A big boost for Pant, who has achieved his career-best ranking! pic.twitter.com/96Jlu1p9Xp
— ICC (@ICC) March 10, 2021
अश्विनचीही भरारी
गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकीपटूंनी चांगली प्रगती केली आहे. अश्विनने न्यूझीलंडच्या नील वॅगनरला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने चौथ्या कसोटीत ८ विकेट्स घेतल्या होत्या. तर या कसोटीत ९ विकेट्स घेणारा अक्षर पटेल ५५२ गुणांसह ३० व्या क्रमांकावर आला आहे.
कारकिर्दीतील पहिल्या ३ कसोटी सामन्यांनंतर क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी पहिल्या तीन सामन्यानंतर क्रमवारीत नरेंद्र हिरवाणी यांनी ५६४ गुण मिळवले होते. तर चार्ली टर्नर यांनी ५५३ गुण मिळवले होते.
याशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने २ स्थानांची प्रगती करत चौथे स्थान मिळवले आहे. गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स कायम आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची मात्र १ स्थानाने घसरण झाली असून तो १० व्या क्रमांकावर आला आहे.
???? R Ashwin at No.2
???? James Anderson at No.4Significant gains for big names in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for bowling! pic.twitter.com/plmtvHkI0P
— ICC (@ICC) March 10, 2021
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीतही अश्विनची प्रगती
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीतही आर अश्विनने शाकिब अल हसनला मागे टाकत चौथ्या क्रमांक मिळवला आहे. शाकिब पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने भारताच्या रविंद्र जडेजाला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. जडेजा तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
Another feather in R Ashwin’s cap ????
He is now the No.4 all-rounder in the latest @MRFWorldwide ICC Test Player rankings! pic.twitter.com/fctHKWQMx0
— ICC (@ICC) March 10, 2021
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर जेसन होल्डर अव्वल क्रमांकावर कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने विश्वचषक खेळला, त्याच जर्सीत पुन्हा उतरणार टीम इंडिया
पंत का राहुल, टी२० संघात कोणाला मिळणार संधी? पाहा काय म्हणाले फलंदाजी प्रशिक्षक
‘सिक्सर किंग’ ही उपमा सर्वात आधी मिळवणाऱ्या ‘या’ भारतीय क्रिकेटरला ओळखले का? पाहा फोटो