भारतीय संघाचा खेळाडू रोहित शर्मा हा कर्णधारपदाची जबाबदारी लीलया पार पाडत आहे. मात्र, यासोबतच तो सलामीला फलंदाजीला उतरून चौकार-षटकारांचा पाऊस पाडत विक्रमही रचताना दिसत आहे. त्याने शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना शतक झळकावले. यासोबतच त्याने सलामीवीर म्हणून कारकीर्दीतील आकडेवारीत आणखी चांगली कामगिरी केली. या लेखातून आपण रोहितच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील सलामीला फलंदाजी करतानाची शतकीय आणि अर्धशतकीय आकडेवारी पाहूयात.
रोहितचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक आणि कसोटीतील सलामीची कामगिरी
गुरुवारपासून (दि. 9 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात नागपूर येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने तिसऱ्या सत्रापर्यंत टिकत शानदार शतक साकारले. त्याने 212 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांच्या जोरावर 120 धावा चोपत शतक साकारले. हे त्याचे कसोटीतील नववे शतक होते.
A marvelous captain's knock from Rohit Sharma ????#INDvAUS pic.twitter.com/RDwBOi3qyq
— cricket.com.au (@cricketcomau) February 10, 2023
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 31 डावांमध्ये सलामीला फलंदाजी करताना झळकावलेले हे रोहितचे सहावे शतक ठरले. तसेच, त्याने 5 अर्धशतकेही मारली आहेत.
रोहितची वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सलामीची कामगिरी
याव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये रोहितने सलामीला फलंदाजी करताना 154 डावांमध्ये 28 शतके झळकावली आहेत. तसेच, त्याने 35 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. रोहितच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सलामीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 4 शतके आणि 24 अर्धशतके केली आहेत. ही कामगिरी त्याने 113 डावांमध्ये केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहित
कसोटी- 6 शतके आणि 5 अर्धशतके (डाव- 31)
वनडे- 28 शतके आणि 35 अर्धशतके (डाव- 154)
टी20- 4 शतके आणि 24 अर्धशतके (डाव- 113)
रोहितची कसोटीतील कामगिरी
रोहित शर्मा याच्या कसोटी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 46 कसोटी सामन्यातील 78 डावांमध्ये फलंदाजी करताना 47.20च्या सरासरीने 3257 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 9 शतके, 1 द्विशत आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. 212 ही त्याची कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. (Rohit as an opener in International cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून
कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ