गुरुवारी (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी शतकी सलामी दिली. त्याचवेळी रोहितने 80 धावांची खेळी करत सलामीवीर म्हणून एक मोठी झेप घेतली.
सलामीला येत आक्रमक फलंदाजी केली. त्याने यशस्वीला सोबत घेत केवळ 20 षटकांत 100 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर देखील रोहित चांगली फटकेबाजी करत होता. मात्र, 80 धावांवर वारिकन याने त्याला बाद केले. सलग दुसऱ्या सामन्यात शतक करण्याची त्याची संधी हुकली.
असे असले तरी, सलामीवीर म्हणून त्याने आपली आकडेवारी आणखी समृद्ध केली. रोहितने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मध्यफळीतील फलंदाज म्हणून केली होती. मात्र, सलामीवीर म्हणून बढती मिळाल्यानंतर त्याने आपली कारकीर्द वेगळ्या उंचीवर नेली. सलामी वीर म्हणून कसोटी क्रिकेट मधील त्याची सरासरी ही तब्बल 53.55 अशी शानदार दिसून येते. तर, वनडे क्रिकेटमधील त्याची सरासरी 55.76 व टी20 क्रिकेटमधील सरासरी 31.50 अशी जबरदस्त आहे. सध्या तो जगातील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखला जातो.
पहिल्या दिवसाच्या खेळाबाबत बोलायचं झाल्यास, पहिल्या डावात भारताने 84 षटकात 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली नाबाद 87 धावांवर खेळत आहे. तसेच, रवींद्र जडेजा हादेखील 84 चेंडूत 36 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशी सर्वांना विराटच्या शतकाचे वेध लागले आहेत. आपल्या कारकिर्दीतील 500 वा सामना खेळत आहे.
(Rohit Sharma Avrage After Become An Opener Cross 50 Average In Test)
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती
नारायणच्या फिरकी गोलंदाजीचा अमेरिकेत राडा, स्टार फलंदाजाचा पहिल्यांदाच सामना करताना दाखवला तंबूचा रस्ता