आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (२३ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा लाजिरवाणा पराभव केला. या सामन्यात कोलकाताने मुंबईचे १५६ धावांचे आव्हान केवळ १६ व्या षटकात गाठले. कोलकाताने त्यांचे केवळ ३ विकेट्स गमावत हे लक्ष्य गाठले. दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मात्र या सामन्यात काही विक्रम त्याच्या नावावर नोंदवले आहेत.
यामध्ये तो सुरेश रैनाचा विक्रम मोडीत काढत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच कोलकाताविरुद्ध १०० चौकार मारणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
रैनाचा विक्रम मोडत, रोहित तिसऱ्या स्थानावर विराजमान
रोहितने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात सुरेश रैनाचा विक्रम मोडीत काढला आहे आणि आयपीएमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५५१३ धावा केल्या आहेत. तर सुरेश रैनाने या स्पर्धेत आतापर्यंत ५४९५ धावा फटकावल्या आहेत. आयपीएमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान विराट कोहलीने मिळवला आहे. त्याने सर्वाधिक ६०८१ धावा केल्या आहेत. यादीत दुसऱ्या स्थानावर ५६१९ धावांसह शिखर धवन कायम आहे.
सुरेश रैना रोहितने तिसरे स्थान मिळवल्यानंतर ५४९५ धावांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. रोहितने आयपर्यंत २०८ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने ३१.६६ च्या सरासरीने या धावा साकारल्या आहेत. आयपीएमध्ये रोहितने आतापर्यंत केवळ एक शतक केलेले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज
६०८१ धावा- विराट कोहली
५६१९ धावा- शिखर धवन
५५०८ धावा- रोहित शर्मा
५४९५ धावा- सुरेश रैना
५४७७ धावा- डेविड वार्नर
कोलकाताविरुद्ध १०० चौकार पूर्ण करणारा रोहित पहिला खेळाडू
या सामन्यात ४ चौकार मारत रोहितने आयपीएलमधील कोलकोताविरुद्धचे त्याचे १०० चौकार पूर्ण केले आहेत. तसेच तो कोलकाताविरुद्ध १०० चौकार मारणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. रोहितने या सामन्यात कोलकाताविरुद्ध १००० धावाही पूर्ण केल्या आणि यापूर्वी हा विक्रमही कोणीही करू शकले नव्हते. आयपीएमध्ये एका संघाविरुद्ध १००० धावा करणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बोल्टच्या चेंडूवर व्यंकटेशचा ‘क्लासिक’ षटकार; डगआऊटमधून भज्जीही म्हणाला, ‘मान गये अय्यर’!
थरारक विजयानंतर केकेआरच्या संघनायकाला जबर धक्का, २४ लाखांचा झाला दंड; पुन्हा चूकल्यास…
आयपीएलच्या धुमधडाक्यात ‘या’ क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनामुळे परतला घरी