fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी

Rohit Sharma Can Achieve Special Records Against KKR Match

September 23, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाला काही दिवसांपुर्वी सुरुवात झाली आहे. आज (२३ सप्टेंबर) या हंगामातील पाचवा सामना अबु धाबी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने येतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होईल.

अशात या सामन्यादरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माला काही दमदार विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. २००८पासून आयपीएलचा भाग असलेल्या रोहितने आतापर्यंत १८९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.४७च्या सरासरीने ४९१० धावा केल्या आहेत. जर रोहितने आज कोलकाताविरुद्ध ९० धावा ठोकल्या, तर तो आयपीएल इतिहासात ५००० धावांचा आकडा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दाखल होईल. Rohit Sharma Can Achieve Special Records Against KKR Match

आजवर केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाज सुरेश रैना यांनी हा कारनामा केला आहे. विराट त्याच्या १७८ सामन्यातील ५४२६ धावासंह या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. तर रैनाने १९३ सामन्यात ५३६८ धावा करत या यादीत दूसरा क्रमांक पटकावला आहे.

याव्यतिरिक्त रोहितकडे आयपीएल इतिहासात २०० षटकार मारणारा चौथा खेळाडू बनण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९४ षटकार मारले आहेत. जर आज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याने ६ षटकार मारले, तर तो या विक्रमाला गवसणी घालू शकतो.

आतापर्यंत आयपीएल इतिहासात २०० षटकारांचा आकडा पार करण्याचा पराक्रम ख्रिस गेल (३२६), एबी डिविलियर्स (२१४) आणि एमएस धोनीने (२१२) केला आहे.

एवढेच नव्हे तर, हा दमदार फलंदाज क्षेत्ररक्षणातील एका मोठ्या विक्रमात डिविलियर्सला मागे टाकू शकतो. आतापर्यंत डिविलियर्सने आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना एकूण ८४ झेल पकडले आहेत. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर रोहित त्याच्या ८३ झेलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय ‘मिस्टर आयपीएल’ रैना या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक १०२ झेल पकडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वॉर्नरच्या हैदराबादला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पडला आयपीएल बाहेर

जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसनने करुन दाखवलं

पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

ट्रेंडिंग लेख –

हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड काय आहे भाऊ ?

१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा

चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद


Previous Post

अच्छा! तर हा आहे चेन्नईविरुद्ध सामनावीर ठरलेल्या सॅमसनच्या यशाचे गमक

Next Post

लिलावात २ करोड मिळालेला क्रिकेटर आयपीएलमधून बाहेर

Related Posts

Photo Courtesy: Twitter
क्रिकेट

“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI & ICC
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण

January 27, 2021
Photo Curtsey: Facebook/Indian Cricket Team
क्रिकेट

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

January 27, 2021
क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

लिलावात २ करोड मिळालेला क्रिकेटर आयपीएलमधून बाहेर

Photo Courtesy: www.iplt20.com

धोनीने ‘या’ कारणासाठी घातला होता पंचाशी वाद, पण...

Photo Courtesy: Twitter/ ICC

कहर! २०११ विश्वचषकात धोनीने षटकार मारलेल्या चेंडूचा अखेर लागला शोध

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.