बुधवारी (८ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) एक मोठा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद सांभाळत असलेल्या विराट कोहली याला या पदावरून काढून टाकले होते. आता रोहित शर्मा याची वनडे संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
विराट कोहलीने स्वतःहून टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयचे असे म्हणणे होते की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दोन नव्हे, तर एकच कर्णधार असायला हवा. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून तो आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माची कारकीर्द कशी राहिली आहे. तर जाणून घेऊया.
वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अशी राहिली आहे रोहितची कारकीर्द
कर्णधार म्हणून रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. २०१७ पासून ते आतपर्यंत त्याने एकूण १० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ८ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधार म्हणून त्याने ८० टक्के सामन्यात विजय मिळवला आहे.
या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे रोहित
गेल्या ४ वर्षांचा इतिहास पाहिला, तर विजय मिळवण्याच्या टक्केवारीच्या बाबतीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. याबाबतीत इंग्लंडचा बेन स्टोक्स, दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्यूमिनी, झिम्बाब्वेचा पिटर मूर आणि न्यूझीलंडचा टॉम लेथम त्याच्यापेक्षा पुढे आहे. कर्णधार म्हणून बेन स्टोक्स, जेपी ड्युमिनी आणि पिटर मूरने १०० टक्के सामने जिंकले आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये केली आहे अप्रतिम कामगिरी
तसेच टी२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्माने २० डिसेंबर २०१७ पासून ते आतापर्यंत एकूण २२ टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी १८ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याने ८१. ८२ टक्के सामने जिंकले आहेत.
तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४० टी२० सामने खेळले आहेत. यापैकी २४ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. तर १२ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि २ सामने अनिर्णीत राहिले.
महत्वाच्या बातम्या :
सौरव गांगुलीचा तो फोन कॉल आला अन् विराटला बसला आश्चर्याचा धक्का; वाचा नक्की काय झालं
युझवेंद्र चहलच्या पत्नीने केली धोनीच्या ‘हेलीकॉप्टर’ शॉटची नक्कल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
धक्कादायक! माजी क्रिकेटर विनोद कांबळी झाला सायबर फ्रॉडचा बळी, चोरांकडून लाखोंची फसवणूक